120 180
Download Bookhungama App

झगमगत्या दुनियेत - सुधीर गाडगीळ

Description:

रंगमंच किंवा पडद्यावरच्या ‘झगमगत्या दुनियेत’ रंगणाऱ्या वलयांकित मुखवट्यांमागचे खरे ‘चेहरे’. रंगमंच किंवा पडद्यावरच्याझगमगत्या दुनियेतरंगणाऱ्या कलावंतांना, अगदी प्रथम, सतरा वर्षांपूर्वीसकाळच्या सदरात उलगडत गेलो. बहुतेक कलावंतांशी पत्रकार म्हणून वरचेवर भेट होत असल्याने, काहींशी दोस्ती जुळली. त्यामुळे वलयांकित मुखवट्यांमागचे खरेचेहरेकळले. त्यांच्या आनंदाच्या, अस्वस्थतेच्या क्षणांचा अंदाज आला. त्यावर कधीभाष्यकरत, कधी अनोखी आठवण टिपत, कधी नेमक्या प्रश्नावरचं त्यांचं थेट उत्तर नोंदवत. ९९ साली वर्षभर हे कलाकार सदरातून रसिकांपुढे मांडत गेलो. ‘फोटोकाढताना नॅचरल पोज द्याअसं म्हणणं, सर्वांत अन् नॅचरलअशी मार्मिक टिप्पणी करणारा ज्येष्ठ स्नेही छायाचित्रकार गौतम राजाध्यक्ष, क्षणात सरदार पटेल उभा करणारादेवाचा हातअसलेला मेकअपमन विक्रम गायकवाड, अचानक अमेरिकेत भेटलेल्या, ‘पांडू हवालदारचा जनक, पटकथाकार राजेश मुजुमदार, यांना बोलतं केलं. अर्चना जोगळेकर आणि आश्विनी भावे या आता अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिनेत्री, सुट्टीवर पुण्यात आल्यावर भेटल्या. शं. ना. नवरे आणि सतीश आळेकर या दोन पिढ्यांतल्या नाटककारांची ओळख करून दिली. राम गणेश गडकरी- वसंत कानेटकरांचे शब्द लीलया खेळवणारे चित्तरंजन कोल्हटकर, चित्र चितारणारा, कविताही करणारा नाना पाटेकर, इंदिरा गांधीबरोबर फुगडी खेळलेल्या मधु कांबीकर, ग्लॅमरस माँ रीमा लागू, महाराष्ट्राची मत्स्यगंधा आशालता, चिकलेटवाला अतुल परचुरे, कस्तुरबा बनलेली रोहिणी हट्टंगडी, बेधडक मोहन जोशी असे पंचवीस-तीस कलावंत मी शब्दबद्ध केले. त्याचं संकलन म्हणजे हे पुस्तक. वसईच्या राजू नाईकांना हे पुस्तक प्रथम प्रकाशित करायला दिलं. त्यांनी हे काम नेटकेपणी केलं. मी त्यांचा आभारी आहे.

आता नव्या रूपात, कलावंतांच्या छायाचित्रांसह ही आवृत्ती उत्कर्ष प्रकाशनातर्फे जोशीबुवा आपल्यापुढे सादर करीत आहेत. हे सारे कलावंत पुनःपुन्हा मला भेटत राहतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, कारकीर्दीची नव-नवी रूपं-छटा, कळत जातात. खरं तर त्यासह नव्यानंच हे कलावंत पुर्नलेखन करून मांडायला हवेत; पण पुन्हा कधीतरी.

तरीही सुबोध भावेसारख्या सध्याच्यास्टारशी नव्यानं बोलून, त्याची व्यक्तिरेखा या आवृत्तीत समाविष्ट केलीय. आणि मधुर भांडारकर सुद्धा!

आदरांजली

दुर्दैवाने विनय आपटे, स्मिता तळवलकर, आनंद मोडक हे माझ्या बरोबरचे, रोजचे गप्पाष्टकातले स्नेही मधल्या काळात निधन पावले. चित्तरंजन बापू, अमरीशजी, गौतम, सुधीर जोशी, बेबी शकुंतला, शं. ना. नवरे असे ज्येष्ठ काळाच्या पडद्याआड गेले. नवी आवृत्ती सादर होत असताना, त्यांनाआदरांजलीवाहण्याची वेळ येईल, असं वाटलंदेखील नव्हतं. त्यांना प्रणाम!

 

ही सारी वलंयाकित व्यक्तिचित्रे वाचतानाबायोडाटापलीकडची, त्या त्या व्यक्तित्वाची छटा वाचायचा आनंद आपल्याला मिळावा.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि