30 50
Download Bookhungama App

व्यवसायाचे सोनेरी नियम - ह. अ. भावे

Description:

कोणत्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक यांच्याशी संपर्क येत असतो. सर्वांशी सहकार्याने काम कसे करावे? व संघर्ष कसा टाळावा? कोणते शिष्टाचार पाळावेत तसेच व्यक्तिमत्व विकास साधून व्यवसायात यशस्वी कसे व्हावे यासाठी आवश्यक गुरुमंत्र या पुस्तकात दिलेले आहेत.प्रस्तावना कुठलाही व्यवसाय असो तेथे अनेकांचे सहकार्य लागते. उदा. किराणा दुकान असेल तर ग्राहक लागतात, सेवक लागतात. अनेक दुकानदार आपल्या कर्मचाऱ्यांना फार कठोर वागवतात, सतत धारेवर धरतात. कठोर वर्तन घातक ठरते. कर्मचाऱ्यांना कुटुंबाचे घटकच समजले पाहिजे. कर्मचाऱ्यांना शाबासकी दिल्यास फार उपयोग होतो. कुठल्याही व्यवसायात कर्मचारी व ग्राहक असणारच. सर्वांशी सहकार्याने काम करावे व संघर्ष टाळावा हा महत्त्वाचा नियम अंमलात आणावा. मालक हा कामगारांचा विश्वस्त असतो. कर्मचाऱ्याला त्याच्या श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे. गोड शब्द व दयाबुद्धी यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रेम मिळते. 'द्रव्य ' म्हणजे श्रममूल्य असते. योग्य ते ‘श्रममूल्य ' दिलेच पाहिजे. नीतीमूल्ये उद्योजकानेही पाळणे आवश्यक आहे. उद्योजक मालाचे उत्पादन करतो. तेव्हा उद्योजकाला विक्री व्यवस्थाही चांगली ठेवता आली पाहिजे. व्यवसायात चातुर्य हवेच. 'चातुर्य ' हा व्यवसायाचा पायाच आहे. ग्राहकाला आणि सेवकांना कटुसत्य सांगण्याची जरूर नम्रते. व्यवसायात ' भावनाप्रधानता ' उपयोगी पडत नाही. उद्योजकाला 'गेंड्याची कातडी ' हवी. कुचेष्टेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. ज्याला वेगळी वाट चोखाळायची आहे त्याने लोक काय म्हणतील? हे भय सोडले पाहिजे. ज्याला व्यवसाय यशस्वी करायचा आहे त्याने नीटनेटके रहायला हवे. उद्योजकाचे दर्शन आकर्षक असावे. उत्तम पोषाख व सौजन्य हे निम्मे भांडवलच असते, व्यसने आणि वाईट सवयी सर्वांनाच महागात पडतात. पण उद्योजकाला हे अवगुण अपयशही मिळवून देतात. उद्योजकाने नम्र व सहनशीलच बनले पाहिजे. जे स्वभावदोष असतात, ते तरुणपणीच दूर केले पाहिजेत. 'शिष्टाचार ' हे व्यवसायाचे भांडवलच असते. वाईट सवयी तरुणपणीच सोडल्या पाहिजेत. व्यवसायात स्पर्धक राहणारच. अतिस्वार्थामुळे स्पर्धा गळेकापू होते. स्पर्धकाच्या यशाचेही स्वागत करावे. व्यवसायाची चिंता असेल तर ती व्यवसायाची शत्रूच असते. नेहमी शुभ बोला आणि कुविचारांना मनाचे दरवाजे बंद करा. कारण तुमच्या मनाचे मालक तुम्हीच आहात. व्यवसाय करणाऱ्याला मान - अपमान विसरावेच लागतात. भूतकाळातील संकटे व दुदैवी घटना विसरल्याच पाहिजेत.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)