Id SKU Name Cover Mp3
Vrukshavalli amha soyare


200.00 350.00
Download Bookhungama App

वृक्षवल्ली आम्हा सोयरे - वैद्य अनुजा वळसंगे

Description:

हे अनोखे ऑडीओ बुक आहे. वृक्षांना लिहिलेली पत्रे. प्रत्येक वनस्पतीमध्ये मानवाला उपयोगी असे गुणधर्म असतात फक्त ते सर्वसामान्यांना माहिती नसतात. डॉ.अनुजा वळसंगे हिने खूप मोलाचे दस्तऐवजीकरण केलेले आहे. वनस्पती व वृक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रांमध्ये वैद्या अनुजा वळसंगे यांच्या त्या संबंधीच्या आठवणी आणि त्यांचे औषधी गुणधर्म या दोन्ही गोष्टींचा मिलाफ केला आहे.

 'न लिहिलेली पत्रे' वरील पत्रांची मी नियमित वाचक होते. ती पत्रे वाचून मला ही आवडत्या वृक्षाला पत्र लिहावे वाटले.. २०१४ मध्ये एक पत्र लिहिले...आणि तेव्हापासून ह्या पत्रांचा प्रवास सुरु झाला. निसर्गाबद्दलचे कुतूहल मनात होतेच. ज्या वृक्षांबद्दल आवड होती त्यांचे औषधी गुणधर्म आयुर्वेद शास्त्राने मला शिकवले. मग या विषयाची आवड अधिकच वाढत गेली..! या वृक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रांमध्ये माझ्या त्या संबंधीच्या आठवणी आणि त्याचे थोडक्यात औषधी गुणधर्म या दोन्ही गोष्टींचा मिलाफ केला आहे. वृक्षांना उद्देशून पत्र लिहिणे हा माझ्यासाठी खूप आनंददायी अनुभव होता. प्रत्येक पत्र लिहिताना तो वृक्ष पुनः नव्याने मला उमगत होता...! आपल्या आजूबाजूला अनेक वृक्ष असतात. आपण रोज त्यांना पाहतो. ही पत्रे म्हणजे अशाच वृक्षांचा आणि माझा संवाद आहेत. 'हर पेड़ कुछ कहता है!' या जाणिवेतून ह्या ऑडीओ-बुकची निर्मिती झाली आहे.

- वैद्य अनुजा वळसंगे


Format:

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि