30 110
Download Bookhungama App

विनू-मिनूची परदेशी सफर भाग १ - लीलावती भागवत

Description:

विनू-मिनूने आपल्या सफरीत जे काल पाहिलं ते आजही दिसतं आणि उद्यादेखील दिसेल. कारण प्रत्येक देशाला त्याची संस्कृती असते आणि ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहतेच.बरं का मुलांनो, काही दिवसांपूर्वी एका संस्थेने मुलांसाठी एक स्पर्धा लावली होती. तिकिटांचा संग्रह करण्याची. वेगवेगळ्या देशातली सुंदर, अर्थपूर्ण तिकिटं जमवायची आणि त्यांचा आकर्षक संग्रह करायचा. ज्यांचा संग्रह उत्तम ठरेल त्यांना बक्षीस मिळणार होतं. बक्षीस कोणतं तर दहा देशांची सफर करण्याचं. ऑस्ट्रेलिया, बर्फाच्या प्रदेशातले काही देश आणि युरोप, आशिया, आफ्रिका या खंडातले काही असे हे दहा देश. तुमच्या एवढ्या बऱ्याच मुलांनी स्पर्धेत भाग घेतला आणि पहिलं बक्षीस विभागून मिळालं दोन मुलांना, मिनू आणि विनू दोघांना. विनू १२ वर्षांचा आणि मिनू १० वर्षांची. दोघांची जाण्याची तयारी झाली. पहिलाच विमान प्रवास आणि तो इतक्या लांबचा. पण मुलं मजेत होती. कारण त्यांना वेगवेगळे दहा देश बघायला मिळणार होते. त्या देशात त्यांनी काय काय बघितलं? प्रत्येक देशातले लोक राहतात कसे, त्यांची घरं कशी असतात, जेवणखाण कोणतं घेतात, त्यांचे पोशाख कसले असतात, त्यांचे खेळ कोणते, सण-उत्सव कोणते, शिवाय त्या त्या देशात बघण्यासारख्या वस्तू, इमारती, झाडं, जंगलं, धरणं... सगळं विनूमिनूने बघितलं. तिथल्याच कुटुंबात ती दोघं राहिली. त्या त्या ठिकाणचे पोशाख घातले. त्या त्या देशातली भाषा... हो! त्यांना कुठे सगळ्या भाषा येत होत्या? पण थोडं थोडं इंग्रजी येत होतं, हिंदी येत होतं. तिकडच्या कुणाला तरी इंग्रजी यायचं, अरब देशात यांचं हिंदी उपयोगी पडलं. कधी कुणी दुभाषा भेटायचा. आणि सरते शेवटी खाणाखुणा, हातवारे यांची भाषा होतीच की बोलकी. या सगळ्यांमुळे त्यांना अडचण नाही आली. अर्थात त्यांनी जे पाहिलं, ते तुमच्यासारख्या आपल्या मित्रमंडळींना सांगावंसं वाटलं त्यांना. म्हणून त्यांनी हे तुम्हाला या पुस्तकात सांगितलंय. शिवाय पटकन् कळावं, वाचायला अडचण होऊ नये म्हणून तुमच्यासाठी सगळं मराठीतच त्यांनी सांगितलंय बरं का! तर मग आता तुम्ही पण चला त्यांच्याबरोबर या परदेश सफरीला! पटापट पावलं टाका. कारण लक्षात ठेवा, जगात सारखी उलथापालथ होते आहे. प्रत्येक देशात काही ना काही बदल होतो आहे. आणि तरी विनू-मिनूने आपल्या सफरीत जे काल पाहिलं ते आजही दिसतं आणि उद्यादेखील दिसेल. कारण प्रत्येक देशाला त्याची संस्कृती असते आणि ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहतेच. - लीलावती भागवत


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि