30 50
Download Bookhungama App

विकासाचा मार्ग - ह. अ. भावे

Description:

स्वतःचा अत्युच्च विकास करणे तुमच्याच हातात आहे.त्यासाठी तुमची क्षमता पूर्णपणे वाढवा. तुमच्या परिपूर्ण विकासासाठी तुम्ही आधी विचार करा आणि मग कृती करा आणि कष्टाला तयार रहा म्हणजे तुमच्या विकासाचा मार्ग कोणीही अडवू शकणार नाही असे मार्गदर्शन या पुस्तकात केलेले आहे.प्रस्तावना जीवनाचा विकास म्हणजे' अमाप संपत्ती गोळा करणे ' असे काहीजण समजतात. पण संपत्ती' हाव ' वाढवते. मग मनुष्य ज्या गोष्टी मिळणार नाहीत त्यांचा पाठलाग करीत राहतो. ' हाव ' वाढल्यामुळे साध्या - साध्या गोष्टीत जे सुख असते तेही त्यांना मिळत नाही व तो दुःखीच राहतो. खरे सुख परोपकारात व निस्वार्थी सेवेत असते. अनेकदा धर्माच्या खोट्या कल्पना' पुढच्या जन्माच्या ' सुखाची आशा दाखवतात. ' सुख ' या जन्मी मिळवायचे असते. तुम्ही रोजची मेहनत हसत - हसत करा त्यातच तुम्हाला सुख लाभेल. तुमच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. त्या इच्छांची परिपूर्ती करायची असेल तर, तुम्ही संकल्प म्हणजे निश्चय केला पाहिजे. तुम्ही करत असलेल्या कार्याविषयी तुमच्या मनात अपूर्व निष्ठा असेल तर तुमच्या इच्छांची परिपूर्ती होईल. काही तरुण' आवडते काम मिळाले तरच मी काम करीन ' असा निश्चय करतात. आवडते काम मिळेलच असे सांगता येत नाही म्हणून, जे काम मिळेल किंवा दिसेल ते तुम्ही करून टाकले पाहिजे. निराश होता कामा नये. निराश झाल्यामुळेच जगात रोज पाचशे आत्महत्त्या होत असतात. तरीही जगण्याची माणसाची शक्ती फार प्रचंड आहे. म्हणूनच तो संकटाशी झगडत राहतो. घरातल्या अनेक माणसात हुशारी असते, कर्तृत्व असते पण ते सुप्त असते त्यामुळे त्यांचे सामर्थ्य वाया जाते. तुम्ही मनात आणले तर तुम्हीही महान होऊ शकाल. अनेकांना संकटाची भीती वाटते. पण, संकटांनी चुरगाळल्यावरच शक्ती जागृत होत असते. काहींना वडिलोपार्जित संपत्तीचे फार आकर्षण असते. पण वडिलोपार्जित संपत्ती म्हणजे' डबके ' असते. स्वनिर्मित संपत्तीच्या झऱ्याचे पाणी तुम्ही प्या. तुमचा विकास व्हायचा असेल तर तुम्ही मन खंबीर ठेवले पाहिजे. कारण मनाचाच शरीरावर प्रभाव असतो. तुम्ही मनाची श्रीमंती मिळवा. स्वतःचा अत्युच्च विकास करणे तुमच्याच हातात आहे. त्यासाठी तुमची क्षमता पूर्णपणे वाढवा. तुमच्या परिपूर्ण विकासासाठी तुम्ही आधी विचार करा आणि मग कृती करा आणि कष्टाला तयार रहा म्हणजे तुमच्या विकासाचा मार्ग कोणीही अडवू शकणार नाही.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)