60 130
Download Bookhungama App

विज्ञान विहार - ना. वा. कोगेकर

Description:

विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचक यांचे दृष्टीने हा कथासंग्रह, नवविज्ञानातील काही महत्त्वाच्या शोधांची ओळख करून घेण्याचे दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.लेखकाचे निवेदन आधुनिक काळात विज्ञानाच्या निरनिराळ्या शाखांत साधल्या जाणाऱ्या प्रगतीचा वेग अतिशय प्रचंड आहे. ही प्रगती साधली जात असताना, विज्ञानशाखांत जे निरनिराळे नवे नवे शोध लागत आहेत किंवा सामान्य मनुष्याला थक्क करून टाकणाऱ्या ज्या नवकल्पना पुढे येत आहेत त्यांची निदान तोंडओळख तरी करून घेणे सामान्य मनुष्य, तरुण विद्यार्थी आदींचे दृष्टीने इष्ट ठरते. कारण त्यामुळे अशा वैज्ञानिक प्रगतीचे यथोचित स्वागत करणे, तिचा स्वीकार करणे अगर तिच्या संभाव्य अनिष्ट परिणामापासून सावध राहणे त्याला शक्य होते. विज्ञान म्हटले की सर्वसाधारण व्यक्तीचे दृष्टीने एक क्लिष्ट व डोक्याला शीण आणणारा विषय असाच समज झालेला आढळतो. तेव्हा आधुनिक विज्ञानातील प्रगतीची, घडामोडींची, त्यामध्ये लागणाऱ्या नव्या शोधांची माहिती, त्यावर एखाद्या कथेचा साज किंवा पेहेराव चढवून, सामान्य वाचकांपुढे ठेवल्यास ती वाचकांचे दृष्टीने स्वीकारार्ह व रंजक ठरेल असे वाटल्यावरून, विज्ञानातील अलिकडच्या शोधांवर आधारित असणाऱ्या व त्यापैकी काही, नियतकालिकांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या माझ्या नऊ विज्ञानकथांचा हा संग्रह, विज्ञानातील स्वैर विहारासाठी विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचक यांचेसाठी मी सादर करीत आहे. प्रस्तुत कथासंग्रहात– प्रयोगनलिका बालक, विश्वातील वस्तू–प्रतिवस्तूचे अस्तित्व, शक्तिशाली विद‌्ध्वंसक किरण, पृथ्वीबाह्य अवकाशातील जीवसृष्टी, गर्भजल तपासणी, मानवीपेशींच्या गुणमण्यातील डी.एन. ए. घटकावरून गुन्हेगाराची निश्चिती आदि आधुनिक विज्ञानातील नऊ ठळक शोधांची पुसटशी तोंडओळख, अशांवर कथांचे पोषाख चढवून करून दिलेली आहे. विद्यार्थी तसेच सर्वसामान्य वाचक यांचे दृष्टीने हा कथासंग्रह, नवविज्ञानातील काही महत्त्वाच्या शोधांची ओळख करून घेण्याचे दृष्टीने उपयुक्त ठरेल अशी आशा आहे. - ना. वा. कोगेकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि