30 96
Download Bookhungama App

विज्ञानगप्पा - जयश्री तांबोळी

Description:

आपण शिकलेल्या शास्त्रीय तत्त्वांचा व्यवहारात अनेक साधनात कसा उपयोग होतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहेप्रस्तावना प्रिय विद्यार्थीमित्र, विज्ञानविषयक काही पुस्तके तुम्ही वाचली असतीलच. हे पुस्तक लिहिण्यामागे तुम्हा विद्यार्थ्यांची जिज्ञासूवृत्ती जागृत ठेवणे हा एक उद्देश आहे. शाळेत शिकवताना आम्हा शिक्षकांना असा अनुभव येतो की, बऱ्याच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाखेरीज अधिक माहिती पाहिजे असते. भिंगाचा उपयोग दुर्बिणीमध्ये होतो एवढेच त्यांना पुरेसे वाटत नाही. निरनिराळ्या प्रकारच्या दुर्बिणी त्यांनी पाहिलेल्या असतात, विद्युत उपकरणे हाताळलेली असतात, वाहनांबद्दल माहिती मिळवलेली असते. फोटोसेल, इलेक्ट्राॅन मायक्रोस्कोप इ. साधनांचा उपयोग त्यांना माहीत असतो. टेलिफोन, रेडिओ, टीव्ही. इ. साधनांचा वापर कसा करायचा हे माहीत असते पण त्यांची रचना आतून कशी आहे, कार्य कसे चालते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हा विद्यार्थ्यांना असते. आपण शिकलेल्या शास्त्रीय तत्त्वांचा व्यवहारात अनेक साधनात कसा उपयोग होतो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी आकृत्या व चित्रे काढली आहेत. ती तुमच्या अभ्यासात नक्कीच पुरक ठरतील असे वाटते. सौ. जयश्री तांबोळी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि