60 128
Download Bookhungama App

व्हिएतनाम अर्थ आणि अनर्थ - वि. ग. कानिटकर

Description:

आजवर झालेल्या युद्धांतील, सर्वात प्रदीर्घ व संहारक युद्धाची ही कथा आहे. व्हिएतनाम, लाओस व कंबोडिया या प्रदेशात गेली तीस-एकतीस वर्षे संघर्ष आहे.प्रस्तावना : तिसरी सुधारित आवृत्ती   औरंगजेबाच्या मोगली सत्तेशी, शिवाजी महाराजांनी शौर्याने व गनिमी काव्याच्या युद्धतंत्राने जो यशस्वी लढा दिला, त्या गनिमी युद्धतंत्राचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील आधुनिक काळातील आविष्कार म्हणजे व्हिएतनामचा स्वातंत्र्यलढा होय. गनिमी काव्याने, हो-चि-मिन्ह जवळजवळ अर्धशतकाहून अधिक काळ धीरोदात्तपणे स्वातंत्र्यासाठी लढत होता. या संघर्षात, तो साम्राज्यवादी शक्तींनी आठ-दहा वेळा त्याच्यावर लादलेल्या देहदंडाच्या शिक्षेतून सुखरूप निसटला.   हो-चि-मिन्ह याने आपला देश सचेत केला. देशभक्तीने भारून टाकला. दोन युद्धे या आत्मिक बळावर पाठोपाठ जिंकली. फ्रेंचांचे वसाहतवादी साम्राज्य त्याने निकालात काढलेच, पण त्यापेक्षा अमेरिकेच्या प्रचंड, लष्करी सामर्थ्याला गनिमी तंत्राने नामोहरम केले व अखेर पराभूत केले. देशाची अखंडता प्राप्त केली. ही त्याची कामगिरी अतुलनीय आहे.दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर राष्ट्रवादाची कास धरून, हिंसा-अहिंसेचा घोळ न घालता सत्ता वापरून, चेतनाहीन राष्ट्र परत उभे करता येते, याचा वस्तुपाठ म्हणजे, हो-चि-मिन्ह याचा लढा होय.   पुस्तकाचे महत्त्व लक्षात घेता, या पुस्तकाची तिसरी आवृत्ती निघत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. ही आवृत्ती प्रकाशित करणारे ‘ अस्मिता प्रकाशना ’चे श्री. रवि बेहेरे यांचे यासाठी मी अभिनंदन करतो.   - वि. ग. कानिटकरदि. १ ऑगस्ट २००८


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि