30.00 58.00
Download Bookhungama App

वाङ्मयेतिहास : एक मुक्तसंवाद - प्रा. गो. म. कुलकर्णी आणि द. दि. पुंडे

Description:

वाङ्मयेतिहासाची संकल्पनातिचे स्वरूप, सद्यःस्थिती आणि तिचे उद्दिष्ट यांचा सांगोपांग विचार प्रा. गो. . कुलकर्णी यांनी आपल्या लेखनातून सातत्याने केला आहे. प्रस्तुत ग्रंथ हा त्यांच्या वाङ्मयेतिहासविषयक चिंतनातून आकाराला आला आहे.निवेदन

गुरुवर्य गो. . कुलकर्णी हे गेल्या शतकातील मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे समीक्षक. गेल्या शतकाच्या उत्तरार्धात प्रा. गो. . कुलकर्णी यांनी लेखनास प्रारंभ केला आणि त्या शतकाच्या अखेरपर्यंत ते लेखनमग्न राहिले. त्यांच्या अर्धशतकाच्या चिंतनातून सकस, विचारप्रवर्तक समीक्षा आकारास आली. ॠजू आणि स्वागतशील अनाग्राही पण चिकित्सक व्यक्तिमत्त्वाच्या प्रा. गो. . कुलकर्णी यांनी आपल्या मूल्यशोधक दृष्टीने मराठी साहित्यविचारात समृद्ध भर घातली.

प्रा. गो. . कुलकर्णी यांच्या साहित्यविचाराचा आवाका व्यापक आहे. प्राचीन आणि आधुनिक अशा समग्र मराठी साहित्याचा धांडोळा त्यांनी आपल्या विचक्षण बुद्धीने घेतला आहे. संत साहित्यापासून दलित आणि ग्रामीण साहित्यापर्यंत सर्व वाङ्मयप्रवाहांची, मराठीतील जवळजवळ सर्व साहित्यप्रकारांची, साहित्यातील नव्या जाणीवांची आणि प्रयोगांची त्यांनी मोठ्या आस्थेने दखल घेतली आहे. या साहित्यपरामर्शात त्यांना जे अनेक प्रश्न पडले ते उपस्थित करून त्या प्रश्नांची उकल करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

श्रेष्ठ कलाकृती ही सहस्त्राक्ष, सहस्त्रपाद असल्यामुळे तिच्याकडे समीक्षेचे सांप्रदायिक पाहाणे एकाक्ष, लंगडे राहाण्याची शक्यता फार; या वस्तुस्थितीचे भान ठेवल्यास समीक्षा निर्मळ ॠजू, अनाग्रही व प्रांजळ होण्यास मदत होते.’ अशी प्रा. गो. . कुलकर्णी यांची धारणा असल्यामुळे त्यांची समीक्षा सांप्रदायिकतेपासून दूर राहिली. तिने विशिष्ट मूल्यांचा आग्रह धरला नाही. साहित्यकृती बहुरंगी, बहुजिनसी असल्यामुळे तिची चिकित्सा बहुविध पद्धतीने करणे शक्य आहे, हे प्रा. गो. . कुलकर्णी यांनी दाखवून दिले. साहित्यकृतीची स्वायत्तता, अनन्यता मान्य करूनही गो. . कुलकर्णी तिचे सामाजिक संदर्भ महत्त्वाचे मानतात.

प्रा. गो. . कुलकर्णी यांची लेखनसंपदा विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे. मराठी साहित्यातील महत्त्वाचे ग्रंथकार आणि साहित्यकृती यांच्याबद्दलची मूलभूत चर्चा त्यांनी खंडनमंडन, साद-पडसाद, वाटा आणि वळणेमराठी साहित्यातील स्पंदनेयासारख्या ग्रंथातून केली आहे. ‘मराठी कादंबरी पहिले शतक’ ‘नाटककार खाडिलकर-एक अभ्यासहे त्यांचे लेख म्हणजे ग्रंथपरीक्षणे आहेत. पण त्यातून प्रकट झालेले त्यांचे चिंतन मूलभूत स्वरूपाचे आहे. प्रा. कुलकर्णी यांनी नाटक, कथा, कादंबरी, काव्य या महत्त्वाच्या प्रकारांची चिकित्सा केली. संत साहित्याचा परामर्श घेतला. ज्ञानदेवांच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक कार्याचा स्वतंत्रपणे ग्रंथरुपाने आढावा घेतला. मराठी साहित्यातील ग्रामीण आणि दलित साहित्याचे अंतरंग तपासले. दलित साहित्याचा समाजशास्त्रीय व वाङ्मयीन अभ्यास केला. वाङ्मयेतिहासाचे लेखन केले. प्रा. गो. . कुलकर्णी यांनी आधुनिक मराठी वाङ्मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी सविस्तर मांडली. मराठी साहित्यातील मार्क्सवादाची आणि गांधीवादाची मीमांसा केली.

साहित्यकृतींच्या बहुविध समीक्षेबरोबरच प्रा. गो. . कुलकर्णी यांनी समीक्षेची तत्त्वचर्चाही केली आणि मराठी समीक्षेची वाटचालही चिकित्सकपणे न्याहाळली. मराठीतील समाजशास्त्रीय पद्धतीचे स्वरूपवर्णन आणि या पद्धतीचे प्रभावी उपयोजन प्रा. गो. . कुलकर्णी यांनी केले आहे.

वाङ्मयेतिहासहा त्यांचा चिंतनाचा विषय होता. ‘वाङ्मयेतिहासाची संकल्पनातिचे स्वरूप, सद्यःस्थिती आणि तिचे उद्दिष्ट यांचा सांगोपांग विचार प्रा. गो. . कुलकर्णी यांनी आपल्या लेखनातून सातत्याने केला आहे. प्रस्तुत ग्रंथ हा त्यांच्या वाङ्मयेतिहासविषयक चिंतनातून आकाराला आला आहे.

 

प्रा. गो. . कुलकर्णी हे सतत वाङ्मयीन विचारात आणि संवादात रमलेले व्यक्तिमत्त्व होते. प्रस्तुत पुस्तक हे आपल्या समानधर्मी सुहृदाशी केलेला संवाद आहे. प्रा. गो. . कुलकर्णी आणि डॉ. . दि. पुंडे या दोघा ज्येष्ठ समीक्षकांचा हावाङ्मयेतिहासया विषयावरील मुक्तसंवाद आहे, साहित्याभ्यासकांना भरपूर वैचारिक खाद्य पुरविणारा आणि विचारप्रवर्तक ठरणारा. म्हणून गुरूवर्य प्रा. गो. . कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या मुक्त संवादाची पुनर्भेट आम्ही साहित्याभ्यासकांना देत आहोत.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि