30 50
Download Bookhungama App

उत्कृष्ट तेच करा - Author not available

Description:

तुम्ही केलेलं प्रत्येक निकृष्ट दर्जाचे काम तुमच्याशी शत्रूप्रमाणे वागते, ते तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली खेचते. आणि मग तुमची प्रगती खुंटते सावधानतेचा इशारा देत आपले काम उत्कृष्ट दर्जाचे कसे आणि का करावे? या विषयी मोलाचे मार्गदर्शन देणारे असे हे पुस्तक आहे.प्रस्तावना ज्याला चारित्र्याने प्रामाणिक व्हायचे आहे त्याने आपले कामही अत्यंत प्रामाणिकपणे केले पाहिजे. जो कामगार आपले काम कसेतरी ओढून काढतो, कामात गलथानपणा करतो, तो अप्रामाणिकच म्हणायला हवा. त्याचा कामातला निष्काळजीपणा व गलथानपणा तेथेच थांबत नाही, त्याच्या आयुष्यात सर्वत्रच तो असे काम करतो. त्यामुळे त्याचे चारित्र्यही उज्ज्वल राहात नाही व गचाळ कामामुळे त्याला यशही मिळत नाही. गचाळ काम करणाऱ्याचे आयुष्यही गचाळच होते. तुमचे काम हे तुमच्या चारित्र्याचा भाग असतो, तुम्ही जेव्हा कामात अळंटळं करता, दुर्लक्ष करता, त्यावेळी तुमची कार्यक्षमता कमी होते व तुमची लायकीही कमी होऊ लागते. तिसऱ्या चौथ्या दर्जाच्या कामाची सवय झाली की त्या माणसाला प्रथम दर्जाचे काम कधी करताच येत नाही. म्हणून कामामध्ये तत्परता हवी. कामातील ढिलाई म्हणजे स्वतःचाच अपमान आहे व तो तुमच्या ध्येयाचाही अपमान आहे. तुम्ही केलेलं प्रत्येक निकृष्ट दर्जाचे काम तुमच्याशी शत्रूप्रमाणे वागते, ते तुम्हाला तुमच्या जागेवरून खाली खेचते. आणि मग तुमची प्रगती खुंटते.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)