60 116
Download Bookhungama App

उर्जावेध - निरंजन घाटे

Description:

उर्जा या विषयावर निरंजन घाटे यांनी लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह आहे. Compilation of articles based on 'energy' written by Niranjan Ghateमनोगत 'ऊर्जा' या विषयावर मी वेळोवेळी जे लेख लिहिले त्यांचे हे संकलन आहे, ऊर्जा प्रश्नानं आज जे गंभीर स्वरूप धारण केलं आहे त्याची आपणा सर्वांनाच जाणीव आहे. पारंपारिक ऊर्जास्रोत म्हणून आपण खनिज तेल व नैसर्गिक वायू आणि दगडी कोळसा यांच्याकडे बघतो; पण या इंधनांचा उपयोग खरं तर गेल्या शे-दीडशे वर्षातला; आणि खऱ्या अर्थानं त्यांचा प्रसार गेल्या ७५-८० वर्षात झाला आणि जेव्हा आपण पर्यायी ऊर्जा साधने म्हणतो तेव्हा या खनिज इंधनांना आपण पर्याय शोधत असतो. ही ऊर्जा साधने आणि दगडी कोळसा हे ऊर्जा साधन काही कोटी वर्षांपूर्वी सूक्ष्मजीव, एकपेशी सागरी जीव आणि वनस्पती भुपृष्ठात गाडली जाऊन तयार झाली. यांना इंग्रजीत 'फोसिल फ्युएल्स’ म्हणतात. आपण त्यांना 'पुराजीवी इंधने' म्हणू ही आज ना उद्या संपणार; म्हणून यांना पर्याय शोधायवा. पुराजीवीं इंधनांचे साठे अमर्याद नाहीत पण ते किती आहेत यावर शास्त्रज्ञांमध्ये गतभेद आहेतच शिवाय ज्या देशांच्या जमिनीत हे साठे आहेत ती राष्ट्रे इतर देशांना वेठींस थरू शकतात, या कारणांमुळे पर्यायी इंधनांना महत्त्व प्राप्त झालं आहे. १९७९ मध्ये अमेरिकेत 'थ्री माइल्स आयलंड' आणि १९८४ मध्ये रशियात चेर्नोबिल इथं झालेल्या अपघातामुळे अणुऊर्जा प्रकल्पांकडे काहीशा साशंकतेनं बघण्यात येऊ लागलं आहे. अणुऊर्जाच्या बाबतीत इतरही धोके संभवतात. या मुळेही इतर पर्यायांकडे अधिक तींव्रतेनं आपलं लक्ष वेधलं गेलं आहे. या छोट्या पुस्तकात 'पर्यायी ऊर्जा साधनां' वर भर देण्यात आला आहे. यामुळे खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि दगडी कोळसा यांची माहिती यात नाही. या इंधनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचाहीं यात यामुळेच ओझरता उल्लेख आढळेल. प्रदूषणावर मी लिहिलेल्या पर्यावरण प्रदूषण या पुस्तकात यासंबंधी माहिती आहेच. याशिवाय ऊर्जाप्रश्नावर सविस्तर चर्चा करणारं एक पुस्तक लिहावं हा मनोदयहीं आहेच; हे लक्षात घेऊन मगच या पुस्तकाचं वाचन व्हावं, ही विनंती. वाचक या माझ्या 'ऊर्जावेध' चे स्वागत करतील, ही आशा. - निरंजन घाटे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि