Id SKU Name Cover Mp3
उन्हातलं चांदणं


60 136
Download Bookhungama App

उन्हातलं चांदणं - केशव फडणीस

Description:

माझं आयुष्य संघर्षाचं नाही तसं फारसं सुखाचंही नाही, पण समाधानी मात्र नक्की आहे. ‘आमच्या वेळी असं होतं’ हे ऐकायला आताची पिढी उत्सुक नाही. पण काय आहे, कितीही उंचावर आपण गेलो तरी आपण किती वर आलो हे पाहायला खाली वाकतोच की नाही- तसंच आपण किती पुढे आलो आणि कसे पुढे आलो यासाठी हे मागे वळणं.मनोगत माझं आयुष्य संघर्षाचं नाही तसं फारसं सुखाचंही नाही, पण समाधानी मात्र नक्की आहे. ‘आमच्या वेळी असं होतं’ हे ऐकायला आताची पिढी उत्सुक नाही. पण काय आहे, कितीही उंचावर आपण गेलो तरी आपण किती वर आलो हे पाहायला खाली वाकतोच की नाही- तसंच आपण किती पुढे आलो आणि कसे पुढे आलो यासाठी हे मागे वळणं. भोरचा आमचा फडणीस वाडा तीनशे वर्षांपूर्वीचा आहे असं म्हणतात. मूळचा मजबूत असल्यामुळे इतकी वर्षं टिकला. आता आजोळच्या वाड्याची पडझड सुरू झाली आहे. वाईचं माझं आजोळचं घरही विकलं गेलं आहे. आपलं घर, एकत्र कुटुंब, माणसं, परंपरा-एकूण वाडा संस्कृती याचा दस्त कुठेतरी असावा म्हणून हा लेखन प्रपंच. आयुष्याला सुरुवात तिथून झाली मग या सगळ्या उघड्या जगातल्या आठवणी. नोकरी निमित्ताने खूप ठिकाणी हिंडावं लागलं तसंच माझी ललित लेखनाची आवड यामुळे स्थल, काल, प्रसंग, व्यक्ती यांचा वेध घ्यावा लागला. नोकरी आणि लेखन यात ज्यांच्या ज्यांच्याशी माझा संपर्क आला किंवा मी ज्यांच्या संपर्कात होतो त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करणं मी माझं कर्तव्य समजतो. काही व्यक्ती आता नाहीतही. व्यक्तिगत जीवनातही माझी नात्यातली माणसं पुष्कळ पण सध्याच्या धावपळीत सगळ्यांची गाठ पडणं अशक्य. सातत्याने ज्यांचा संबध आला त्यांचा उल्लेख येणं अपरिहार्य झालं. जुन्या गोष्टींच्या तपशिलात काही चूक असेल तर क्षम्य मानावं. माझ्या या अनुभवांतून, आठवणींतून मी माणूस शोधण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे. माणसातील चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे. पुस्तकाची मुद्रण प्रत तयार करण्यासाठी श्री. सत्यजित वैद्य, श्री. सुरेश माने आणि श्रीमती संगीता बापट यांनी मोलाची मदत केली, तसंच उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सुधाकर जोशी यांनी प्रकाशनाचे काम उत्कृष्ट पार पाडलं, त्यासाठी मी या सर्वांचा ऋणी आहे. - केशव फडणीस


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि