60 116
Download Bookhungama App

उद्याचे संगणक (IT 2020) - डॉ. दीपक शिकारपूर

Description:

संगणकाचे स्वरूप व त्याची उपयुक्तता सतत बदलत आहे. संगणक वापरासाठी सर्वांना उद्युक्त करणे व त्या विषयीचे गैरसमज दूर करणे ह्यासाठी मी अनेक माध्यमातून लेखन, व्याख्याने ह्यांचा वापर करत असतो. हे पुस्तकही त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.लेखकाचा परिचय

 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावर डॉ. दीपक शिकारपूर हे नाव आदराने व बहुमानाने घेतले जाते. आपल्या उंचपुऱ्या व भारदस्त व्यक्तिमत्त्वाने ते सर्वांवर सहज छाप पाडतात. पण मराठी भाषिकांना त्यांची ओळख त्यांच्या सातत्याने प्रसिद्ध होणाऱ्या लिखाणाने व विविध व्याख्यानमालेतील सहभागाने आहे.

आपल्या शालेय व उच्च शिक्षणात वरच्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारे डॉ. दीपक शिकारपूर यांनी अभियांत्रिकी पदवी व व्यवस्थापकीय पदव्युत्तर शिक्षण घेतले व आपल्या व्यावसायिक कारकिर्दीचा श्रीगणेशा टेल्को येथे केला. सुमारे १६ वर्षें टाटा उद्योगसमूहात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्यावर त्यांनी जागतिक दृष्टी व स्थानिक अंमलबजावणी अशी अभिनव वाट चोखाळण्यासाठी एक कल्पक मार्ग शोधला. ‘ऑटोलाईन डिझाईन’, ‘क्यूएआय’, ‘प्युअर आयटी’, ‘सीड इन्फोटेक’, ‘फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरया उद्योगांचे ते संचालक आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्यामाहिती तंत्रज्ञान समितीचे अध्यक्ष आहेत. भारतीय विद्या भवनाच्या पुणे केंद्र समितीचे मानद सदस्य आहेत. पुणे विद्यापीठाच्या संगणक अभ्यासक्रमाचे ते प्रमुख आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण अभ्यास मंडळाचे एक संचालक आहेत. नुकतीच त्यांची रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१चे प्रांतपाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर) २०१३-१४ म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

आपल्या व्यावसायिक वाटचालीत त्यांना विविध पारितोषिके मिळाली आहेत. कॉसमॉस पुरस्कार, रँग्लर परांजपे पुरस्कार, वीर सावरकर पुरस्कार, ‘सिटाडेल प्रभावी व्यक्तिमत्त्वही काही महत्त्वाची नामोल्लेख करण्यासारखी उदाहरणे. ‘इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनियर्समहाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सचे ते सन्माननीयफेलोआहेत. ‘वीर सावरकररँग्लर परांजपेपुरस्कार त्यांना मराठी लेखनाबद्दल मिळाले आहेत. वरील सर्व पदे व पुरस्कार आजपर्यंत ज्यांना मिळाले त्या सर्वांपेक्षा तरुण वयात हे पुरस्कार मिळवून त्यांनी एक मानदंड निर्माण केला आहे. ज्ञान, अभिनवता व कल्पकता या गुणांच्या जोरावर त्यांनी हे स्थान मिळवले आहे.

वरील वाटचाल करताना व त्यात भरघोस यश मिळवतानाच मराठी भाषिकांसाठी आपल्या मातृभाषेत सोप्या भाषेत ज्ञानाचा प्रसार विविध माध्यमांद्वारे करताना त्यांनी एक वेगळाच वस्तुपाठ तरुण पिढीला घालून दिला आहे. गेल्या दशकात ३३हून अधिक देशांना भेटी देणाऱ्या दीपकनी परदेशी कायमस्वरूपी वास्तव्य (सहज शक्य असतानाही) टाळून मराठी प्रदेश, मराठी भाषा व मराठी माणूस यांच्यासाठी आपले कार्य सीमित केले आहे. यापूर्वी त्यांनीमाहिती तंत्रज्ञानविषयी १५ पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी अनेक पुस्तकांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.

व्यावसायिक धडाडी, सामाजिक जबाबदारी व औदार्य या सर्वांची योग्य सांगड घालणारे व काही विशिष्ट ध्येयधोरणे डोळ्यांसमोर ठेवून कार्यरत असणारे श्री. दीपक शिकारपूर कौतुक व अभिनंदनास पात्र आहेत. पत्नी सौ. गौरी व चिरंजीव वेदव्रत ह्यांची त्यांना सतत साथ लाभते.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि