Id SKU Name Cover Mp3
Tumachi Mazi Aai


0.00 50.00
Download Bookhungama App

तुमची - माझी आई - प्रज्ञा वझे - घारपुरे

Description:

काळ आणि समाज-स्थिती जरी बदललेली भासत असली,  तरी प्रत्येक विवाहित स्त्री कडूनच सर्व घरदाराच्या क्षेम-कल्याणाखातर जीवन-समर्पणाची जी एकांगी अपेक्षा केली जाते, त्यामध्ये काडीमात्रही बदल आढळून येत नाही.प्रास्ताविक

कोणतीही स्त्री किंवा पुरूष, एकदा का संसारी झाले, की आपापल्या जीवनात व्यग्र होऊन जातात. सर्व सामाजिक जबाबदाऱ्या सुद्धा मी मी म्हणत उरावर येऊन बसतात. पुढे एखाद-दुसरं मूलबाळ झालं, तर व्यवधानांचा पसारा  अजूनच वाढतो. स्त्री-पुरूष हे एकाच जीवन-रथाची दोन चाके आहेत, असे नारे कितीही पुकारले तरीही रथ एकाच बाजूने जास्त झुकलेला दिसतो. काळ आणि समाज-स्थिती जरी बदललेली भासत असली,  तरी प्रत्येक विवाहित स्त्री कडूनच सर्व घरदाराच्या क्षेम-कल्याणाखातर जीवन-समर्पणाची जी एकांगी अपेक्षा केली जाते, त्यामध्ये काडीमात्रही बदल आढळून येत नाही.

भरीत भर पडते जेव्हा ती दोन जीवांची होते. गर्भारपण जरी काही महिन्यांपुरतं असलं, तरी ती स्त्री आजन्म दोन मनांची होऊन राहाते. तिचं अस्तित्व तिच्यातल्या ह्या नव-जाणिवेमध्येच भरून राहातं... कायमसाठी. तेच तिला चेतना देत राहातं... जगण्यासाठी. प्रत्येक धुक्यातून तिची स्वतःची अशी वाट शोधण्यासाठी. 

जगदंबेच्या अशा प्रत्येक रूपाला मनोभावे नमन, नी हेच ह्या पुस्तकाचं प्रयोजन.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि