60 114
Download Bookhungama App

ट्रिंग.. ट्रिंग.. फास्टर फेणे - भा.रा.भागवत

Description:

फास्टर फेणे लेखक बनतो!, फोन करतोय फास्टर फेणे, पार्सलबाजी अंगाशी आली! आणि फास्टर फेणेची घोडदौड! इत्यादी कथांचा भा. रा. भागवत लिखित 'ट्रिंग.. ट्रिंग.. फास्टर फेणे' या पुस्तकात आस्वाद घेता येणार आहे. फास्टर फेणे लेखक बनतो! (बन्याने स्वतः सांगितलेली साहसकथा) ट्रिंग-ट्रिंग! - ओ हॅलो! मी फास्टर फेणे बोलतोय. - साधना कचेरी ना? - येस्-येस् दि सेम चॅप! नेफा आघाडीवरून नुकताच परत आलोय. कुमार अंकाची मुदत भरत आलीय अन् मला किनई- पेन वापरायची सवय नाही. शाईने बोटं माखतात. ‘आयडिया’ साठी डोकं खाजवायला लागलं की नाकतोंडही माखतं. म्हणून म्हणतो..... अ... .डिक्टेट केली नाही. -नाही, रागावू नका! -बरं, चालेल. कथामालेत सांगेन...... तोंडी. मग लेखनाचं पाहू? कुमार अंकासाठी काहीतरी लिहावं ही आयडिया आली तेव्हा मी नेफा आघाडीवर होतो. जी-सेव्हन ठाण्यावर घमासान लढाई झाली; त्यानंतर लामाचं सोंग घेऊन आलेल्या एका चिन्याचं टाळकं मी सडकलं, ते तुम्हांला आठवतं ना? तेव्हाची गोष्ट आहे. कमांडरसाहेबांनी माझं हात दाबून अभिनंदन केलं. पण त्याच वेळी बजावलं की, आता कम्प्लीट रेस्ट घे; देवासारखा बसून राहा; कुठेही कडमडू नकोस. मी तोंडाने आवंढा गिळला होता. अन् कानांनी ते शब्द गिळले होते. दोन दिवस कुठेही कडमडलो नाही. देवासारखा बसून राहिलो. टपालातून मासिकं येत; ती चाळली. त्यात साधनेचा अंक चाळला. कुमार अंकाची जाहिरात त्यात वाचली आणि समोरच्या आरशात टवकारून पाहिलं. माझ्या डोळ्यांत काहीतरी पाणी चमकलेलं दिसलं. मी टाळ्याला जीभ लावली अन् आवाज काढला- ‘ट्टॉक!’ रात्रभर मला झोप आली नाही. मेंदू जसा काही पेटला होता. काहीतरी शिजत होतं. काय कुणास ठाऊक! पण इतकी वर्ष पुण्याला शांतपणे शाळेत घालवली तेव्हा कधी सुचलं नाही ते बेटं आत्ता सुचत होतं. माझ्यातला कलाकार जागा झाला होता. तो म्हणत होता- ‘तू काहीतरी चिताड किंवा खरड.’ चिताड? कधी जन्मात चित्र काढलं होतं का या फास्टर फेण्याने? बसलो काढायला तर रेघोट्या काढून ठेवीन नुसत्या आणि पेन्सिलीपेक्षा रबराचाच उपयोग जास्त करीन. चालेल—मन म्हणालं, खूप खाडाखोड केलीस तर टोन येईल तुझ्या रेघांना. मग हाफटन ब्लॉक करून छापतील संपादक. हाफटन! बाप रे! म्हणजे भलताच मोठा!


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि