60 116
Download Bookhungama App

त्रैराशिक - राजेंद्र बनहट्टी

Description:

राजेंद्र बनहट्टी हे मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून सुपरिचित आहेत. बनहट्टी यांचे अकरा कथासंग्रह विशेष गाजले. त्यांच्या त्रैराशिक या कादंबरीला महाराष्ट्र शासनाने हरी नारायण आपटे सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्कार देऊन गौरवले आहे. ही कादंबरी मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावाचे कंगोरे उलगडत जाते. आपल्या खास लेखनशैलीने बनहट्टी वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. Rajendra banahatti is well-known storyteller and novelist from Marathi literature. He was awarded with ‘Hari Narayan Apte’ best novel award of state government of Maharashtra For his popular novel ‘Trairashik’. This Novel is about human nature, emotional travel, relationships and behavior. He engrosses reader with his deft handling of his characters and lucid narrative. प्रस्तावना  शनिवार पेठेतल्या दादा उपासनीच्या दुमजली जुनाट वाड्याच्या पार्श्व भूमीवर ही कादंबरी सुरु होते. वृद्धापकाळाने दादांचा मृत्यू होतो. मात्र आपल्या पश्चात आपल्या मुलाचं काय होणार याचीच त्यांना खंत असते. दादांची विधवा वाहिनी अर्थात काकी दादांच्या मुलाची म्हणजे बापुची जबाबदारी उचलते. खेडे गावातल्या एका गरीब कुटुंबातल्या मुलीशी त्याचे लग्न लाऊन देते. गावातले प्रतिष्टीत वकील प्रतापराव दिवाण यांच्याकडे बापू नोकरी करत असतो. अविवाहित असलेल्या प्रतापरावांची कीर्ती फारशी चांगली नाही. लग्नानंत काही दिवसांनी आपल्या प्रतापरावांनी आपल्या बायकोला इंग्रजी शिकवावे म्हणून गळ घालतो. सडपातळ बांधेसुध अनसूयेकडे साहजिकच प्रतापराव आकर्षित होतात. शिकवणीच्या निमित्ताने वारंवार एकत्र येत असताना प्रतापरावांचे आकर्षण वाढत जाते. त्या दोघांच्या अश्या जवळ येण्याला बापुरावाची पूर्ण संमती असते. बापू स्वतः अनसूयेला प्रतापरावांकडे घेऊन जात असतो. पुढे अनसूयेला दिवस जातात. बापू असे का करतो? प्रतापराव आणि अनसूया यांचे पुढे काय होते? म्हाताऱ्या विधवा वाहिनीला हा प्रकार कळतो का? अर्थातच कादंबरी वाचताना याची उत्तरे मिळत जातात मात्र हे प्रश्न आणि त्यांची उत्तरे वाचकांना सुन्न करणारी आहेत. राजेंद्र बनहट्टी यांची प्रवाही लेखन शैली पुढे नक्की काय होणार याची उत्कंठा वाढवत राहते.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि