Id SKU Name Cover Mp3
तिळगुळ (भाग ०१)


60 140
Download Bookhungama App

तिळगुळ (भाग ०१) - आरती देशमुख

Description:

न लिहिलेली पत्रे' या लोकप्रिय फेसबुक पेजवरील एक गाजलेली पत्रमालिका.प्रिय, अजून आठवतो तो क्षण. खरं तर मी चुकीचं बोलतेय. खरं हे की, विसरतंच नाही रे. एखादा क्षण आठवतो ना तेव्हा कळते त्याची किंमत. काळाच्या अजस्त्र अन् अनादि अनंत प्रवाहात एक क्षण म्हणजे काय? पण तोच आठवला की, व्यापून उरतो अवघी काळसरिता!! तसाच तो क्षण... अन् झालं रे, गेलास तू. गेलास म्हणजे गेलासच. म्हणजे या जगातून नाही गेलास, आहेस; म्हणजे असशीलच, पण माझ्यापासून गेलास. कोणी म्हणतील, असं काही राहिलंय का आता? काळ किती बदललाय. ‘एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ’ वगैरे आता अशक्य. पण मला ठाऊक आहे, अन् तुलाही... होय. असंच झालं आहे. भेटलो होतो त्या दिवशी संध्याकाळी. तळ्यात पाय सोडून. त्या पायऱ्यांवर बसायचं होतं आपल्याला. पण आपल्याला बसायचं होतं तिथे बसले होते काही लोक. त्यांना तरी दोष कसा द्यायचा? सगळ्या शहराचंच तळं ते. तो अनुभव नव्हता आपल्या भाळी लिहिलेला. मग मी रडवेलीच झाले. खरं तर रडूच लागले. आपल्याला तळ्यात पाय सोडून अमुक जागी बसायचं होतं अन् ते शक्य होत नाहीय म्हणजे काय? सगळं जगबिग वाईट, देव दुष्ट वगैरे झालं. तू हात हातात घेतलास माझा अन्... किती माया होती रे तुझ्या हातात! माझा सारा उद्वेग वितळला अन् वाहू लागला डोळ्यातून. तू थोपटलंस अन् समजूत घातलीस. पुढच्या वेळी नक्की बसू तळ्यात पाय सोडून हे समजावलंस तेव्हा मी समजले. मग मी म्हणाले, “मला तुझं असं एक नाव दे ना. म्हणजे जगासाठी असलेलं माझं एक नाव, एक टोपणनाव, एक लाडाचं नाव; पण त्याहून निराळं एक फक्त तू दिलेलं नाव. ज्या नावाने फक्त तूच मला हाक मारशील. मी सुद्धा नाही उच्चारणार ते नाव.” मग माझ्या डोळ्यात खोलवर पाहात तू माझ्या डाव्या गालावरील तिळावर तुझी तर्जनी ठेवली, हळूच. तसाच पाहत राहिलास एकटक अन् काही जाणवायच्या आत, माझ्या कानाशी आलास अन् म्हणालास- ‘तिळगुळ’. मी स्वतःला गोळा करतच होते तर कानात केवढ्याने कुर्र केलंस. मी तर दचकलेच. मग म्हणालास, तुझं नाव ठेवलंय.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि