60 116
Download Bookhungama App

तिघी - राजेंद्र बनहट्टी

Description:

तिघी हा तीन दीर्घ कथांचा संग्रह आहे. या कथा मानवी भावभावना, नातेसंबंध आणि स्वभावाचे कंगोरे उलगडत जातात. आपल्या खास शैलीने बनहट्टी वाचकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी होतात. This book is compilation of tree different stories about human nature, emotional travel, relationships and behavior. He engrosses reader with his deft handling of his characters and lucid narrative. प्रकाशकाचे मनोगत  आगंतुक, ‘असीटन’ आई आणि ठकुबाई या तीन दीर्घ कथांचा हा संग्रह आहे. या तिन्ही दीर्घकथा अनुक्रमे १९९७, १९९८ आणि २००७ साली वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. राजेंद्र बनहट्टी यांनी कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, स्फुटलेखन, नाटक असे विविध प्रकारचे लेखन केले असले तरी प्रामुख्याने कथालेखक आणि कादंबरीकार म्हणून त्यांची ओळख आहे. गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा, युद्धपर्व, मध्यंतर, यासारखे त्यांचे कथासंग्रह मराठी साहित्यात उत्कृष्ट म्हणून गणले जातात. “गंगार्पण”, “कृष्णजन्म”, “लांडगा”, यांना महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार मिळाले आहेत. “अखेरचे आत्मचरित्र” या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीला राज्यशासनाने सर्वोत्कृष्ट कादंबरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. इतरही अनेक वाङमयीन पुरस्कारांनी बनहट्टी यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत कथा संग्रहामध्ये तीन कथा तीन वेगवेगळ्या सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर घडतात. यातील पहिली कथा ‘आगंतुक’ ही स्त्रि-पुरुष विशेषतः पती-पत्नी यांच्यातील नातेसंबंधांबद्दल बोलते. उतारवयात दिवस गेलेल्या ‘स्त्री’ची ही कथा आहे. तिचं मुल हे तिच्या परिवारासाठी, समाजासाठी कसं आगंतुक ठरणारं असतं; आणि या परिस्थितीत तिला कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं..? ते या कथेत उलगडते. दुसरी कथा ही थेट आपल्याला ब्रिटीश काळात घेऊन जाते. कथेचा निवेदक हा एक शाळकरी मुलगा आहे. आणि त्याच्या नजरेतून तत्कालीन एकत्र कुटुंब व्यवस्था, समाज आणि विशेषतः जातीभेद मांडला आहे. या शाळकरी मुलाच्या घरी आईची मदतनीस म्हणून वावरणाऱ्या बायजाची ही गोष्ट आहे. विशेष प्रसंगात बायजाला मिळणारी त्रयस्थ वागणूक, तीच नोकर असूनही हक्काने वावरण, मुलाच्या आईने सर्वस्वी बायजावर अवलंबून असणं आणि तरीही विशेष प्रसंगी बायजा निव्वळ ‘हरिजन’ आहे म्हणून ती अस्पृश्य ठरवली जाणं असे अनेक कंगोरे लेखकाने निर्माण केले आहेत. आणि त्याचवेळी शाळकरी मुलाच्या भाबडेपणाने ते उलगडण्याचा प्रयत्नही केला आहे. एका प्रसंगात बायजा घरात चोरी करते आणि रंगे हात पकडली जाते, या प्रसंग पूर्ण कथेला कलाटणी देणारा ठरतो. या कथासंग्रहातील तिसरी कथा आहे ‘ठकुबाई’. माणसाचा स्वभाव किती चित्रविचित्र असू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही कथा, सून आपल्या सासूची म्हणजे आजीची गोष्ट सांगते. वाचकाला गुंतवून ठेवण्याचे लेखकाचे कसब या कथेत पुन्हा एकदा जाणवते. म्हटली तर खाष्ट, म्हटली तर मायाळू, खरतर विक्षिप्त स्वभावाच्या आजीची ही कथा आहे. दाखवण्याच्या कार्यक्रमापासून ते सुनेला मुलगा होणं त्याचं बालपण मग शिक्षणासाठी परदेशी जाणं अश्या टप्प्यांनी ही कथा उलगडत जाते शेवटच्या टप्प्यात आजीला अर्धांगवायूचा झटका येतो आणि त्यानंतर कथेचा सूर बदलतो. सुरवाती पासून लेखक थोड्या मिश्किलपणे आजीचे पात्र रंगवतो. स्वच्छतेचा अतिरिक्त आग्रह असणारी ही आजी भुलेश्वराचा सारा नेवैद्य करायची पण स्वतः अजिबात देवभोळी नव्हती. रोजचं जेवण सुद्धा अंघोळ करायच्या अगोदर करायची. ही आजी अशी का? या प्रश्नाच उत्तर मिळवण्यासाठी ही कथा वाचली पाहिजे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि