30 50
Download Bookhungama App

थोरांचे सातशे सुविचार - ह. अ. भावे

Description:

सुविचार व्यवहारात वागताना, प्रवासात किंवा मनात भावनांचा उद्रेक झाल्यावर फार उपयोगी पडतात. हे पुस्तक विशेषतः तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. त्यांचे आयुष्य अजून घडावयाचे आहे. हे आयुष्य घडवणारा किंवा बदलवून टाकणारा एखादा छोटासा सुविचारसुद्धा असू शकतो. जीवनाला वळण लावू शकणारे हे पुस्तक आहे.प्रस्तावना 'आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हावे, आपला व्यवसाय चांगला चालावा,’ - असे प्रत्येकालाच वाटते. पण त्यासाठी सुविचार मनात भरणे फार आवश्यक आहे हे सुविचार थोरांचे असावेत, कारण त्या विचारांच्या आधारानेच त्या थोरांनी उत्तुंग यश मिळवलेले असते. तुम्ही म्हणाल की, 'या संग्रहात फक्त सातशे सुविचार दिले आहेत.' पण मराठीत व इंग्रजीत अक्षरशः हजारो सुविचार आहेत पण माणसाला यशस्वी व्हायचे असेल तर एक - दोन सुविचार पुरेसे होतात. उदा., ‘समय हीच संपत्ती’ – किंवा – ‘निर्व्यसनी असावे', या दोन सुविचारांच्या आधारानेही आयुष्य यशस्वी करता येते. पण जगात नव्वद टक्के लोकांना कसले - ना - कसले व्यसन हे असतेच. म्हणून 'निर्व्यसनी असावे ' - हा दोनच शब्दांचा सुविचार अंमलात आणायला किती कठीण आहे हे समजेल. येथे सातशेपेक्षा जास्त सुविचार दिलेले आहेत. त्यातील आवडेल तो सुविचार तुम्ही डोळ्यापुढे ठेवा व त्या सुविचाराची अंमलबजावणी करा. सुविचार वाचून सोडून देऊ नका. त्याचा जीवनात वापर करा. म्हणजे तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त होऊ शकेल आणि तुमचे आयुष्यच बदलून जाऊ शकेल. अनेक थोर माणसांचे सुविचार येथे गोळा केले आहेत. त्यांची नावेही देता आली असती. पण 'नावापेक्षा विचार महत्त्वाचा आहे.' मधमाशी ज्याप्रमाणे अनेक फुलातून मधाचे कण गोळा करते आणि आपले पोळे भरते. त्याप्रमाणे अनेक ग्रंथातून हे सुविचार गोळा केले आहेत. सुविचाराचे मोल किती आहे हे ठरवता येत नाही. एका तामिळ लोककथेत एका पंडिताने एक सुविचार राजाला दोन लाख मोहोरांना विकल्याची गमतीदार कथा आहे पण अतिशयोक्ती सोडली तर खरोखरच एक - एक सुविचार लाखमोलाचा असतो. आज जीवनात असंख्य समस्या उभ्या राहतात. अस्थिरता वाढत आहे. कितीही धडपड केली तरी प्रश्न सुटत नाही त्यामुळे शारिरीक व मानसिक थकवा येतो. उत्साह राहात नाही म्हणून मोठे - मोठे ग्रंथ इच्छा असूनही वाचता येत नाहीत. म्हणून अशा वेळी मनाला समाधान व प्रेरणा देण्यासाठी आदर्श म्हणून, महान पुरुषांचे सुविचार मनात भरुन ठेवल्यास फार उपयोगी पडतात. म्हणूनच थोरांचे सुविचार येथे संग्रहित केले आहेत. हे सुविचार व्यवहारात वागताना, प्रवासात किंवा मनात भावनांचा उद्रेक झाल्यावर फार उपयोगी पडतात. हे पुस्तक विशेषतः तरुणांसाठी व विद्यार्थ्यांसाठी लिहिले आहे. त्यांचे आयुष्य अजून घडावयाचे आहे. हे आयुष्य घडवणारा किंवा बदलवून टाकणारा एखादा छोटासा सुविचारसुद्धा असू शकतो. तुमच्या जीवनाला वळण लावू शकणारे हे महत्त्वाचे पुस्तक मी तरुणांच्या हाती देत आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने हे सतत जवळ बाळगावे व त्याचे पुन्हा - पुन्हा वाचन करावे त्यामुळे त्याचे जीवन उज्ज्वल होईल अशी खात्री देता येते.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)