100 210
Download Bookhungama App

ठगाची जबानी - मेडोज टेलर

Description:

कर्नल टेलरने ‘ठगाची जबानी’ ही कादंबरी १८३७ मध्ये लिहिली. ‘‘एका ठगाच्या जबानीला’’ टेलरने दीर्घ प्रस्तावना लिहून ठगीचा उगम, ठगांचे व्यवहार, ठगांची संख्या वास्तव्याची ठिकाणे, ठगांचा त्याने केलेला बंदोबस्त याविषयी बरीच माहिती संशोधनपूर्ण दिलेली आहे. हा ग्रंथ वाचून भीती व आश्चर्य निर्माण व्हावे अशी त्याची अपेक्षा आहे. लेखक म्हणतो, ‘‘प्रस्तुत जबानीतील हकीकत अगदी सत्य आहे, फक्त त्यातील प्रसंगाची जुळणी एका विशिष्ट संगतीने त्याने केलेली आहे. घोर कृत्ये वाचीत असतानाही वाचन मनोरम करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे.प्रस्तावना १८३७ साली ‘‘एका ठगाची जबानी’’ हे पुस्तक मेडोज टेलर या लष्करी अधिकाऱ्याने लिहावयास घेतले. एका मोठ्या आजारातून तो उठला होता. अशक्तपणा आला होता. टेबलाजवळ खुर्चीवर बसता येत नव्हते. आरामखुर्चीत पडून दोन्ही गुडघ्यावर ठेवलेल्या एका फळीचे टेबल बनवून, स्वत:चे मन रमविण्यासाठी ही कादंबरी त्याने लिहिली. ही कादंबरी छापली जाईल अशी त्याला कल्पना नव्हती. पण त्याच्या मित्रांना ती आवडली. १८३९ मध्ये ती छापली गेली. ती छापली जात असताना प्रुफांच्या अवस्थेत ही कादंबरी त्यावेळची इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने वाचली. तिलाही ती आवडली! ठगाचे जीवन अगदी जवळून पाहाण्याची व अभ्यासण्याची संधी लेखकाला मिळाली. त्याचे जीवन लष्करी पेशात गेले! टेलर वयाच्या पंधराव्या वर्षी मुंबईला आला. एका मोठ्या प्रसिद्ध व्यापारी कंपनीत तो कारकून म्हणून एका बड्या माणसाच्या वशिल्याने चिकटला, परंतु ती मोठी व्यापारी कंपनी बोगस ठरली. कंपनीचे दिवाळे निघाले व त्याची फसगत झाली. एका ओळखीच्या माणसाने त्याला निजामाच्या पोलिस दलात चिकटवलं. दोन वर्षात तो असिस्टंट सुपरिटेंडेंट ऑफ पोलिस झाला! फिलिप मेडोज टेलरचा जन्म २५ सप्टेंबर १८०८ रोजी झाला, शिक्षणाची पहिली पंधरा वर्षे त्याच्या जन्मग्रामी म्हणजे लिव्हरपुलला गेली. नंतर १८२४ ते १८६० म्हणजे ३६ वर्षे त्याने भारतातच काढली. १८४१ पर्यंत तो निजामाच्या सेवेत होता. नंतर बारा वर्षे तो सोलापूरला कलेक्टर होता. नंतर १८५३ ते ५८ या काळात तो वऱ्हाडचा कमिशनर होता. १८५७ च्या बंडापासून वऱ्हाड व महाराष्ट्र अलिप्त व सुरक्षित ठेवण्याचे, बंडखोरांना दक्षिणेकडे घुसू न देण्याचे महत्त्वाचे कार्य कर्नल साहेबांनी केले. १८५८ ते ६० मध्ये तो पुन्हा सोलापूरचा कमिशनर झाला व १८६० मध्ये निवृत्त झाला व इंग्लंडला परत गेला.त्यानंतरही एक-दोन वेळा तो भारतात येऊन गेला होता. मेटोन येथे दक्षिण फ्रान्समध्ये १३ मे १८७६ साली, वयाच्या ६८ व्या वर्षी तो मरण पावला. भारतात १८२४ ते १८६० इतकी-छत्तीस वर्षे तो राहिला. तो कंपनी सरकारच्या सेवेत कधीच नव्हता. निजाम सरकारच्या नोकरीवर असताना ठगांचा बंदोबस्त करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य याने केले आहे. कर्नल टेलरने ‘ठगाची जबानी’ ही कादंबरी १८३७ मध्ये लिहिली. ‘‘एका ठगाच्या जबानीला’’ टेलरने दीर्घ प्रस्तावना लिहून ठगीचा उगम, ठगांचे व्यवहार, ठगांची संख्या वास्तव्याची ठिकाणे, ठगांचा त्याने केलेला बंदोबस्त याविषयी बरीच माहिती संशोधनपूर्ण दिलेली आहे. हा ग्रंथ वाचून भीती व आश्चर्य निर्माण व्हावे अशी त्याची अपेक्षा आहे. लेखक म्हणतो, ‘‘प्रस्तुत जबानीतील हकीकत अगदी सत्य आहे, फक्त त्यातील प्रसंगाची जुळणी एका विशिष्ट संगतीने त्याने केलेली आहे. घोर कृत्ये वाचीत असतानाही तो वाचन मनोरम करण्याचा लेखकाने प्रयत्न केला आहे. भारतासारखा फार विस्तीर्ण देश. त्यात नद्या, जंगले, डोंगर वाळवंटे. प्रवासाच्या सोई जवळजवळ नाहीत. तीर्थयात्रेसाठी, व्यापारासाठी व सैन्याच्या हालचालीसाठी काही प्रवास आवश्यक असे. या प्रवासाच्या मार्गावर नैसर्गिक आपत्तीबरोबर जंगली जनावे, भुरटे चोर, जंगली आदिवासी, राज्यांच्या हद्दीवरील जकातीचे अधिकारी, सशस्त्र टोळ्या यांचाही खूप त्रास असे. काशीसारख्या दूर प्रवासाला लोक आयुष्याच्या शेवटीच जात, परत येऊ अशी खात्री नसे. परत आल्यानंतर मोठा उत्सव करीत, भारतात एकछत्री सत्ता कधीच नव्हती, बंडे, सत्तांतरे, स्वाऱ्या, अराजके याचे प्रमाण ही भरपूर होते.! त्यातल्या त्यात भारतात ज्या अनेक संस्थांनी किंवा बादशाही सत्ता होत्या, त्या १७५७ पासून निश्चितच दुबळ्या होऊ लागल्या. १८०० पयँत त्या अत्यंत दुबळ्या झाल्या. १८२० नंतर त्या जवळजवळ नष्ट झाल्या. तेव्हा ठगांसारख्या लोकांचा धंदा फोफावला. वाटमारी, लूट, दरोडे, गावोगाव अकारण मनुष्य वध यांचे प्रमाण वाढले. क्वचित काही संस्थानिकांनी एखाददुसऱ्या ठगास पकडून फाशी दिले. पण काही संस्थानिकांनी ठगास गुप्त आसरा देऊन त्यांच्या मिळकतीत वाटणीही मागितली. ‘शिंदे सरकारला ठग, स्वसंरक्षण व आश्रयासाठी मोठी रक्कम देत. शिंदे सरकारच्या सिंधोस परगाण्यात नऊशे ठग होते. त्यांच्याशी संग्राम करून मि. हाँलडेड याने त्यांचा पराभव केला. अनेक इंग्रज अधिकऱ्यांनी ठगांविरूद्ध मोहिमाच सुरू केल्या. नर्मदानदीच्या काठावरील प्रांताचा पोलिटिकल एजंट स्लीमन (नंतर तो मॅतजस्ट्रेट व नंतर तो कर्नलही झाला) याने ठगाविषयी संशोधन करून मोठा ग्रंथच लिहिला आहे. १८३१ ते १८३७ या काळात, जनरल सुपरिटेंडेंट कोरनॉल्डस याने उत्तर हिंदुस्थानात ठगांचा बंदोबस्त खात्याचा प्रमुख म्हणून काम पाहिले.त्याच्या या ६ वर्षांच्या अहवालात १७२७ ठग पकडले. पैकी १२३६ इतक्या ठगांची चौकशी करून कैदेत घातले व ४१२ ठगांना फाशी दिले. याशिवाय ३२६६ ठग त्याच्या ताब्यात कच्च्या कैदेत होते! ठगीचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ते कायदे केले. हिंदुस्थानात १८ उच्च श्रेणीचे अधिकारी नेमले. ठगांना पकडून देणारास बक्षिसे लावली. पकडलेल्या ठगांना कठोर शिक्षाही केल्या.! ‘ठगी’ चा उगम कसा व नक्की केव्हा झाला हे सांगणे कठीण आहे. मोठ्या प्रमाणात ठगी चौदाव्या शतकात दिल्लीच्या आसपास चालू होती असे इतिहासात दाखले आहेत. दिल्ली ते आग्रा प्रवास करताना इ.स. १६६६ मध्ये ही थेवनॉट नावाच्या प्रवाशाला ठग भेटले होते असे त्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रात व प्रवासवर्णनात नमूद केले आहे. याच काळात इजिप्त मध्येही ‘ठगी’ होती. तिकडील एक प्रवासी सेनेका याने,’ गळ्याला प्रेमाने मिठी मारून त्याच क्षणी गळा दाबून मारणऱ्या चोरांच्या हकिगती दिल्या आहेत. त्यांचे पूर्वज एक्सेरक्सेस या देवताची पूजा करून कापडाची गुंडाळी हत्यारासारखी वापरत. सागर्तिया लोकांचे वंशजही हा धंदा करत. भारतावर आक्रमण करणाऱ्या पहिल्या मुसलमान सुलतानांबरोबर ते भारतात १४ व्या शतकात आले व दिल्लीच्या परिसरात राहिले! चारशे वर्षे त्यांचा धंदा चालला व वाढलाही. कंपनी सरकारने या ठगांचा बंदोबस्त करण्याविषयी पहिली योजना आखली ती १७९९ मध्ये. उत्तरप्रदेशातील औंध संस्थान घेतले तर त्याचे क्षेत्रफळ होते १४०६ मैल त्या संस्थानात प्रसिद्ध, व क्रूर कर्मा ठग होते २७४! (अज्ञात, अगणित) म्हणजे प्रत्येक ५ मैलात एक ठग होता. यापैकी २४ ठग पकडले व ते माफीचे साथीदार झाले. त्यांच्यापैकी एक बहराम म्हणून होता त्याने एकट्याने ९३१ लोकांना रुमालाने गळा दाबून मारले होते. फहीखान म्हणून होता त्याने ५०८ लोक ‘ठगी’ केले होते.! ही एका जिल्ह्यातील परिस्थिती होती. यावरून सर्व भारतात या ठग्यांनी केवढा प्रचंड धुमाकूळ घातला असेल याची कल्पना येईल.! ठगांचा पूर्ण बंदोबस्त व्हायला १८६० साल उजाडावे लागले. नंतरही ठगांचा बंदोबस्त हे खाते व त्यावरील अधिकारी १९०४ पर्यंत अस्तित्वात होते. मनुष्य वध करणे हे ठगाचे व्रत असे व हे कित्येक लोकात पैतृक वारसा म्हणून चालत असे. या व्रताची अधिष्ठात्री देवता काली, भवानी असे. हिंदू, मुसलमान, शिख कोणताही धर्म असला तरी आपला धर्म संभाळून ही दीक्षा कुणालाही घेता येत असे, ठग आपल्याबरोबर एक छोटी कुऱ्हाड म्हणजे त्या कालीमातेचा एक दात समजत. रूमाल हे त्यांचे शस्त्र. रूमालाचा रंग पांढरा अगर पिवळा असे. कालीचे हे दोनच रंग आवडते असत. कालीमातेकडूनच हे वस्त्र, एक चाकू, कुऱ्हाड प्रसाद म्हणून मिळे. मनुष्य वध करणे हे त्यांचे धार्मिक कृत्य वा व्रत असे. असा वध केल्याबद्दल त्यांना दु:ख पश्चाताप होत नसे, त्याच्या मनाला कधी सदस्द्विवेक बुद्धीची टोचणी लागत नसे. ठगांत निरक्षरता बरीच असे. त्यांचा शकुनावर अतिशय विश्वास असे. गाढव भेटणे, ससा दिसणे, किंवा आडवा जाणे वगैरे अनेक शकून ते मानत. देवीला कौल लावून आदेश मागत. छोटे मोठे यज्ञ करीत. काही ठग सभ्य प्रतिष्ठित जीवनही जगत! अमीर अली, जो या कथेचा नायक आहे तो प्रतिष्ठित जीवन जगतो, व तो साक्षर आहे. अपशकुनाकडे तो कधी कधी दुर्लक्ष करतो. त्याचे दुष्परिणाम त्याने भोगले आहेत. ठगांना पकडणे सोपे असे. परंतु त्यांच्यावर आरोप ठेवून त्यांना शिक्षा करणे कठीण जाई. ठगांविरुद्ध साक्ष द्यायला कुणी धजावत नसे. स्वत:चा बाप, भाऊ, मुलगा जरी ठगांनी मारला असेल तरी तो गृहस्थ साक्ष द्यायला आपला नंतर सूड घेतला जाईल या भयाने पुढे येत नसे. ठगांनी व्यापाऱ्यांना लुटले तरी सरकारने ती परत मिळवलेली लूट, आपली संपत्ती आहे असे सांगायला, किंवा हिशेब सादर करायला व्यापारी पुढे येत नसत. कोर्टात हेलपाटे घालणे नको वाटे. व सरकारी चौकशीत आपणच नसत्या अडचणीत येऊ या भीतीने ते लोक मागेच राहात. त्यामुळे पुष्कळ ठग शिक्षेविना सुटत. या कादंबरीचा नायक आहे अमीर अली रंगवताना इतर अनेक ठगांची कृत्ये व पराक्रम त्याला चिकटले आहेत. बुलवर लिटन याने एका ठगांची हकीकत लिहिली आहे, त्यातील काही भाग टेलरने उचलला आहे. सरकारी दप्तरातील ठगांच्या खऱ्या कहीकतींचाही उपयोग केलेला आहेच! ही कादंबरी फिलिप मेडोज टेलरने ठगांच्या बंदोबस्तात विशेष लक्ष घालणाऱ्या लॉर्ड व्युल्यम बेंटिक व लॉर्ड जॉर्ज आक्लंड या उभयता गव्हर्नर जनरलांना आदराने अर्पण केलेली आहे.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)