60 132
Download Bookhungama App

तेनालीरामच्या गोष्टी - केदार केळकर

Description:

पूर्वी दक्षिण भारतात, कर्नाटकात कृष्णदेवराय हा राजा राजकारभार करीत असे. त्याच्या पदरी दरबारी मंत्रीमंडळाखेरीज एक हुशार खुषमस्कऱ्याही होता..... तो म्हणजे तेनालीराम..... तो राजाची हलकी-फुलकी कामेही करीत असे. सर्वच बाबतीत तो स्वामिनिष्ठ होता. त्याला राजाने ‘राजविदुषक’ यासारखा विशेष दर्जा दिलेला होता. या चातुर्यकथा उपदेशपर आणि मनोरंजक अशा आहेत.तेनालीराम सर्वच बाबतीत स्वामिनिष्ठ होता. त्याला राजाने ‘राजविदुषक’ यासारखा विशेष दर्जा देण्याचे ठरवले. हे जेव्हा बाकी अधिकारी-दरबारी लोकांना समजले तेव्हा ती गोष्ट सर्वांच्या मनाला खटकली आणि ‘तेनालीच्या बाबतीत काही तरी खुसपट काढून राजाच्या मर्जीतून त्याला खाली खेचायचे’ असे त्या बाकीच्या अधिकाऱ्यांनी ठरवले. सर्वांनी गुपचुप एकत्र भेटून त्याच्या नकळत त्यांनी एक कट रचला. दुसऱ्या दिवशी जेव्हा दरबार भरला, तेव्हा सर्व दरबारी अधिकार्यां नी आलटून - पालटून तेनालीच्या विरोधात राजाचे कान फुंकण्याचे काम चालू केले. त्या राजमंत्र्यांपैकी एकाने सांगितले की, ‘‘महाराज हा जो ‘आपला’ तेनाली आहे ना, त्याने गावात जनतेला छळण्यास सुरवात केली आहे. तुम्ही त्याला दरबारी बढती देण्याचे त्याला समजल्यावर तो फुशारून गेला आहे. लोकांना धाक-धमक्या देऊन तो त्यांच्याकडून खंडणीच गोळा करायला लागलाय! खूप दिवस हे असं चाललंय !! त्याने अशा मार्गाने पुष्कळ ‘धनमायाच’ साठवली आहे. !!!’’ त्या मंत्र्यांच्या म्होरक्याचे हे शब्द ऐकून राजाला ध:क्काच बसला. डोक्यांला हात लावून बसला. बराच विचार करूनही त्याचा, या बातमीवर काही विश्वास बसेना ... शेवटी राजाने त्या मंत्र्याला ‘ तू गप्प बस रे .... खाली बस, आपल्या कामाचा विचार कर !’’ असे बोलून खालीच बसवले. ही बोलाचाली सर्वांनी ऐकली. बिचारे सर्वजण चिडिचूप झाले. पण ... कोणालाही गप्प बसवेना. त्यांच्यात एकमेकांत चुळबुळ सुरू होतीच. त्यांनी पुन्हा; एक वेगळीच ‘खी’ खेळायचे ठरवले तेनालीच्या विरोधात .... एका गरीब शेतकर्यातला पढवून चढवून दुसर्याीच दिवशी दरबार भरल्यावर त्याला तेथे आणलं व खोटंनाटं बोलायला भाग पाडलं तेव्हा तो राजासमोर येऊन म्हणाला, ‘‘महाराज- महोदयांनी ह्या तेनालीरामाला कडक शासनच करावे. त्याने मला गावाजवळच्या शेततळ्यातून माझ्या शेतीसाठी पाणी पुरवठा करुन देण्याचे आश्वालसन दिले. नुसते आश्वावसन नाही तर त्यासाठी त्याने माझ्याकडून बरीच रक्कमही घेतली आहे. माझ्याकडचे सोने नाणे विकून मी त्याला पैसा दिला. खूप दिवस झाले. त्याने पाणीपुरवठा केलाच नाही पण, घेतला पैसा परत मागितले तर ‘ये उद्या - ये परवा’ असे खोटे वायदेच करतोय. महाशयांनी काहीतरी इलाज करावा आणि माझी यातून सुटका आणि तेनालीला शासन करावे.’’ राजाने चौकशी करुन त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे त्या गरीब शेतकर्याेला आश्वासन दिले व परत पाठवले. इकडे तेनालीरामविरोधी बाकीचे उच्च मंत्रीमंडळ आपण त्याच्या विरोधात खेळलेली खेळी खेळून वेगळ्याच आनंदात राजाच्या, पुढच्या निर्णयाची वाटच पहात होते. एवढ्यातच दरबारात तेनालीरामाची स्वारी हजर झाली. राजाने लगेचच तेनालीरामाकडे शेतकर्याेच्या बाबतीत चौकशी केली. तेनालीने त्याबाबतीत खुलासा देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. राजाने काहीही मान्य केले नाही फक्त ‘‘दरबार सोडून जा’’ अशीच एकदम आज्ञा केली. शेवटी खिन्नमनाने.... तेनाली घरी गेला ... दुसर्याक दिवशी एका सहकार्याहच्या हस्ते त्याने ‘ राजास पत्र ’ पाठवले. त्यात लिहिले होते, ‘‘महाराज आपण माझ्या देशभक्ती आणि स्वामिनिष्ठेवर शंका घेतली. आता माझ्या जीवनात काही ‘राम’ नाही. सबब मी आत्मत्याग करीत आहे अपाण सदैव सुखशांत रहावे आपणास अखेरचा दंडवत !! - आपला तेनालीराम. तेनालीरामाच्या सहकार्याोनेच हे पत्र राजाला भर दरबारात वाचून दाखवले होते. ते ऐकून राजाला इतके दु:ख झाले की डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. त्याला तेनालीच्या सच्च्या इमानदारीची खात्री होती .... बाकीचेही मंत्री ज्यांनी हा खोटा कारभार केला होता तेही त्याला ‘ इमानदार होता ’ असे खोटंखोटंच म्हणत होते पण , मनातून त्यांना मोकळं-मोकळं वाटत होते ते मनात म्हणत होते ‘चला तेनालीची कटकट गेली !!’’ तेवढ्यात दरबारात जमलेल्या सामान्यजनांमधून एक साधारण शेतकर्यााचा वेष केलेली व्यक्ती राजाच्या समोर येऊन त्याने तेथे समोर येऊन आपले खरे रूप दाखवले तर तो साधारण शेतकरी नसून साक्षात तेनालीरामच होता. हात जोडून तो राजाला म्हणाला, ’’आपल्या दु:खाश्रूंमधून मला, माझ्या स्वामीनिष्ठेची आणि मंत्री अधिकार्यांाचीही खरी किंमत कळली. त्यामुळे मी फुकट मरण्यापासून वाचलो.’’ हे ऐकून- पाहून बाकी दरबारी अधिकारी शरमले आणि राजा पुन्हा तेनालीरामाला पाहून पूर्वीसारखा प्रसन्न झाला.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)