Id SKU Name Cover Mp3
तर प्रिय आजी (भावाश्याची पत्रे) भाग - १


80 174
Download Bookhungama App

तर प्रिय आजी (भावाश्याची पत्रे) भाग - १ - चंद्रकांत भोसले

Description:

भावश्या नावाच्या एका अत्यंत गरीब दलित मुलाने आपल्या आजीच्या जागवलेल्या सुंदर आठवणी Beautiful letters written by a poor, dalit child Bhavshya to his illiterate grandmother remembering his childhood.मनोगत

साधारणतः अकरा महिन्यांपूर्वी भावशा प्रथम मला भेटला आणि मला एका वाक्प्रचाराची आठवण झाली - तो आला ...त्याने पहिले...आणि तो जिंकला.  मी पाहता क्षणी ह्या लहान मुलाच्या म्हणजे भावशाच्या प्रेमात पडलो. पहाता पहाता भावशाच्या डोळ्यांनी त्याचे घर, त्याची आजी, त्याच्या झोपडीतील शेळी, कोंबड्या, चिमण्या, त्याचा कुत्रा...त्याची घराशेजारची थोडीफार शेती...त्याची शाळा, त्याचे मित्र आणि त्याचे मास्तर ह्यांचे विश्व मी पाहू लागलो. नुसते पाहू नव्हे तर...अनुभवू सुद्धा लागलो. जणू भावशा ऐवजी मीच तिथे आहे...मीच ते जगतो आहे...मीच ते अनुभवतो आहे. भावशा म्हणजे कोणी परीकथेतील राजकुमार नाही...ना तो भरजरी कपडे घालतो, ना त्याच्या आयुष्यात कोणी राजकन्या आहे, न त्याला कधी परी भेटते आणि तरी सुद्धा तो मला खूप आपलासा वाटला. त्याचा भाबडेपणा, त्याची आजीवरची अपार श्रद्धा, आजूबाजूच्या विषम समजा कडे पहायची त्याची निर्विष वृत्ती....मला खूप भावली.  बर भावशाची आजी तरी कशी? त्याच्याच भाषेत सांगायचे झाले तर... “तुला नही ना वाचता येन्हार..तरी पत्र लेहेतोय ...मिळाल्यावर घी  वाचून कोणाकडून तरी...!! आडाणी गोळा तू ... तुला टाक माहित नही.....दौत माहित नही....का बोरू माहित नही ...अक्षर म्हंजी काय तू शेळ्यांना आणून खाऊ घालती ते शिपरूट नही....का उसाच्या कोंबळ्या नही.....का तू दळण करीत अंगणात बसल्यावर भरा-भरा उडत येन्हाऱ्या चिऊताया नही. ...!” आजीला भावशा पत्र लिहितो...तिच्याशी बोलतो...तिच्या जवळ आपले मन मोकळे करतो...कधी तिच्यावर रागावतो, आणि क्षणात तिच्या कुशीत शिरतो...मायेशी उब शोधत...आणखी कुठे मिळणार त्याला ती...मायेची उब.  तो आजीला लिहितो ... आम्हाला तू कच्च्या दोऱ्याने का होईना बांधून ठेवलं होतंस. खूप ताकद होती त्या दोरयात... नात्याची विन घट्ट करणारी. सगळे दोरीतच होते तेंव्हा. सगळ्यांना दोरीत ठेवणारा पाहिजेच असतो प्रत्येक घरात...नाहीका ग आजी..! तू होतीस तेंव्हा कुणाची एकमेकांपासून दूर जाण्याची हिम्मत नव्हती. तू अचानक आम्हाला सोडून निघून गेलीस आणि प्रत्येकाला मुक्ततेच्या व्हायरस ने ग्रासून टाकल. ही विस्कळीत झालेल्या नात्यांची मोळी बांधायला तू हवी होतीस आजी...! चंद्रकांत भोसले ह्यांनी जी भाषा वापरली आहे...ती भावशा एवढीच गोड आहे...लडिवाळ आहे. ह्या जीवनाचे सम्यक दर्शन शहरी किंवा ग्रांथिक भाषेतून करता आलेच नसते.  कित्येक शब्द सुरुवातीला आकळत नाहीत आणि तरीही  ते एक चित्र आपल्या मनात रेखाटतात...हे कसे होते? सरांच्या निवेदनात गुरफटून गेलेला वाचक  त्या शब्दाला स्वतःचा असा एक अर्थ देतो संदर्भांसहित आणि मग सगळेच वाचकाला उलगडत जाते.  हि जादू आहे प्राचार्य चंद्रकांत भोसले ह्यांच्या ओघवत्या निवेदन शैलीची. सरांच्या भाषेला अलंकारांचे आवडे आहे. ती बिचारी...रोख ठोक....ओबड धोबड आणि आरस्पानी आहे. ती सरळ मनाला जाऊन भिडणारी आहे. आडवळणे तिच्यासाठी नाहीत ना तिच्या मध्ये अवास्तव भावनिक आवाहन. तिच्या मध्ये आहे एक प्रांजळपणा, एक खरेपणा आणि तिच्यातून वाहतो निर्व्याज प्रेमाचा एक अखंड झरा. प्राचार्य चंद्रकांत भोसले ह्यांनी एकूण १२० पत्रे आजीला लिहिली...ती “सृजन” तर्फे आम्ही दोन खंडात प्रकाशित करीत आहोत. केवळ पुस्तकाच्या स्वरूपात नव्हे तर ऑडीओ बुक आणि कॉमिकच्या स्वरूपात सुद्धा. वाचक मित्रानो...ह्या अपूर्व मेजवानीचा मनसोक्त आनंद लुटा ....आणि त्याची पोच आमच्या पर्यंत येउद्या.   - सृजन


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि