Id SKU Name Cover Mp3
स्वयंविकासाची वाटचाल


80 180
Download Bookhungama App

स्वयंविकासाची वाटचाल - डॉ. सुधीर राशिंगकर

Description:

स्वयंविकास आपोआप होणार नाही. त्यासाठी प्रयत्न करायला हवेत' हे सांगणारे पुस्तकप्रस्तावना ‘विकास’ ही एक प्रक्रिया आहे व ती सातत्याने घडत असते. ही प्रक्रिया आपण, आपणांस पाहिजे त्या वेगाने, पाहिजे त्या दिशेने घडवू शकतो. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात व त्या प्रयत्नांसाठी आपल्याला मार्ग दिसावे लागतात. असे काही मार्ग दाखवण्याचा प्रयत्न या ‘स्वयंविकसाची वाटचाल’ या पुस्तकात केला आहे. यात उल्लेखलेले विविध पैलू हे मानवी विकासाच्या जडणघडणीत उपयोगी पडणारे आहेत. अर्थात इथे उल्लेखलेल्या सर्व बाबतींत मी स्वतः परिपूर्ण आहे, असा माझा दावा नाही. माझ्या बाबतीतही विकासाची प्रकिया ही एक सातत्याची बाब आहे. या पुस्तकात समाविष्ट केलेल्या लेखांतील गोष्टी, उदाहरणे, वचने, कविता हा माझ्या प्रतिभेचा आविष्कार नाही, हेही सांगणे आवश्यक आहे. विविध निमित्तांनी, विविध प्रकाशनांतून मासिकंतून वा अन्य मार्गाने हे सर्व वाचनात आले, ते उत्तम वाटले, म्हणून संग्रही ठेवले व ते सूत्ररूपाने इथे गुंफले. त्यामुळे त्यातल्या प्रतिभेचे श्रेय त्या त्या व्यक्तीचे. हे लेख विविध निमित्तांनी ‘संपदा’, व्यापारी मित्र श्रमविश्व यांमधून स्वतंत्रपणे प्रकाशित झाले व ते पुस्तकरूपाने आता आपल्यापुढे ठेवत आहे. पुन:प्रकाशनासाठी संमती दिल्याबद्दल त्या त्या नियतकालिकाचा मी आभारी आहे. उत्कर्ष प्रकशनाचे श्री सुधाकर जोशी व सौ. सविता जोशी यांनी प्रकाशनाची जबाबदारी उचलली, त्यांचाही मी आभारी आहे. या पुस्तकाचा आपल्या व्यक्तिमत्त्व-विकसात वा जडणघडणीत उपयोग होईल, अशी आशा आहे. तसा तो होवो, अशी शुभेच्छा. सुधीर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि