120.00 250.00
Download Bookhungama App

स्वाक्षरी - वि. ग. कानिटकर

Description:

स्वाक्षरीही वाचणाऱ्याला कोड्यात टाकणारी नसावी आणि ती कुणाची आहे हे सहज लक्षात आणून देणारी, पुरेशी स्पष्ट असावी असे मला वाटते.स्वाक्षरीचे स्वरूप

स्वाक्षरीचे पहिले लेखन पूर्ण केल्यावर मी ते काही निकट नातेवाईकांना व मित्रांना दाखवले. बहुतेकांनी आपला अभिप्राय दिला. आपआपली मते व मतभिन्नताही कळवली. या सर्वांचा मी आभारी आहे!

मला आलेल्या प्रतिसादांचा आशय लक्षात घेऊन, मी लेखनावर आवश्यक ते संस्कार केले व आता हीस्वाक्षरीवाचकांच्या हाती देत आहे.

या लेखनाचे स्वरूप कौटुंबिक नोंदी व हकिगती असे आहे. प्रत्येक कुटुंबात असे एक सतत भर पडू शकणारे पुस्तक असावे, असे मला वाटते. पुढच्या पुढच्या पिढीतील कुणीतरी हा इतिहास सांगत राहावा म्हणजे विस्मृतीत सतत काळवंडून जाणारे क्षण पुढील पिढ्यांना संदर्भ सांगत राहतील.

आमचे घराणे, माझ्या आईचे घराणे - जोगळेकर व देवल कुटुंब यांचा हा प्रामुख्याने त्रोटक निबंध आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती रूढ असल्याने, तीन कुटुंबांचे चित्रण यात आले. आता यापुढे जे अशा प्रकारचे लेखन करतील त्यांना आपले आई वडील, एखादा भाऊ वा एखादी बहीण (असल्यास) पत्नी व एखाद दुसरा मुलगा वा मुलगी असे छोटे मर्यादित कुटुंबच लेखनविषय असणार आहे.

आयुष्यात जे आनंदाचे क्षण व प्रसंग आले तेवढेच नोंदवावे असा काहींचा आग्रह असतो; परंतु असे निवेदन एकांगी असते. बऱ्यावाईट अनुभवाची नोंद असणे, पुढील पिढ्यांना खराखुरा संदर्भ मिळण्यासाठी आवश्यक असल्याने मी सर्व प्रकारचे प्रसंग ग्रथित केले आहेत. पूर्वायुष्यातील काही मित्रांचा तुमच्या जीवनप्रवाहावर भलाबुरा परिणाम होत असतो. उत्तर आयुष्यातील मित्र हे आनंददायी परंतु दूरस्थच राहतात त्यामुळे लिहिण्याच्या ओघात एक दोन मित्रांच्याच हकिगती यात आल्या आहेत.

माझ्या आयुष्यभराच्या लेखन-वाचनाच्या उद्योगात मला जे अनेक स्नेही लाभले, लेखक मित्र मिळाले, कौतुक करणारे समीक्षक लाभले, संपादक लाभले, प्रकाशक लाभले, त्याचप्रमाणे साहित्यबाह्य क्षेत्रात असूनही ज्या मित्रांनी माझ्यावर लोभ केला, मदत केली, आनंद दिला या सर्वांचा उल्लेख या माझ्या लेखनात नाही, कारण या पुस्तकाचा हेतूच निराळा आहे.

लेखक म्हणून माझ्या बद्दलचा किंवा माझा असा जो मजकूर आहे तो लेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करणारा व वेगवेगळ्या वळणावर माझा लेखनप्रवास सूचित करणारा एवढाच आहे.

स्वाक्षरीही वाचणाऱ्याला कोड्यात टाकणारी नसावी आणि ती कुणाची आहे हे सहज लक्षात आणून देणारी, पुरेशी स्पष्ट असावी असे मला वाटते.

 

वि. . कानिटकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि