60.00 116.00
Download Bookhungama App

स्वच्छंद - सी. एल. कुलकर्णी

Description:

संत महात्मे ह्या अवस्थेला समाधी म्हणतात असं मला वाटतं. समाधी अवस्थेत त्यांना मिळणाऱ्या आनंदाची वर्णने माझ्या ह्या मानसिक स्थितीत असतानाच्या अनुभवाशी तंतोतंत जुळतात. मग मला कुणाचीच पर्वा नसते आणि ते रंजक प्रसंग कागदावर उतरतात. जसा मुक्त छंद तसा हा माझा स्वच्छंद.....!! स्वांत सुखाय.मनोगत

छंदबद्ध कवितांचा एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येक छंदाचा एक स्वभाव असतो. स्वभावानुरूप गाव असतो तसाच शब्दाशब्दात उमटणारा प्रासंगिक भाव असतो.

सात स्वरांच्या विविध रचनांमधून असंख्य रचना जन्माला येतात. स्वरांचे निरनिराळे समूह त्यांचे राग बांधतात. प्रत्येक रागाची स्वतःची आपली विशेष ओळख असते. त्यांना अनुरूप काळ वेळ साधून ते आळवले जातात. ते सुखरंजन करतात दुःखभंजन करतात. रमवतात, रिझवतात, शहाऱ्यांचे मनोरे उभे करतात.

पंचमहाभूतांनी घडवलेला माणूस सूर्यमालिकेतल्या नानाविध ग्रहांच्या अधिपत्याखाली वावरत असतो. अनेक व्यवधानं सांभाळत असतो. हसत खिदळत कण्हत कुथत आयुष्य व्यतित करत असतो. येणाऱ्या मार्गातल्या सर्वच घटना मनासारख्या नसतात तरीही त्यांवर मात करत अडथळे ओलांडत असतो. मनासारखं वागणारी फक्त एकच संस्था प्रत्येकाजवळ कार्यान्वित असते ते म्हणजे स्वतःचं मन. स्वतः स्वतःशी केलेला संवादच फक्त आपल्याला हवा तसा असू शकतो. म्हणून माणसाला दोन मनं असतात ही संकल्पना जन्माला आली असणार.

इथे घडणारी गोष्ट, ज्याची त्यालाच फक्त माहीत असते. अनपेक्षितपणे घडलेल्या चुकीचं सांत्वन किंवा समर्थन, पूर्ण क्षमतेने आणि आत्मीयतेने तुमचे तुम्ही करू शकता. अतृप्त इच्छा आकांक्षामुळे पडणारी स्वप्न ही अशा मनाच्या खेळांचीच प्रतिबिंब असतात. स्वप्न काल्पनिक आणि झोपेत पडत असली तरी त्याच्या संवेदना शरीराला होत असतात. अखेर मन आणि शरीर यांचा समन्वय घडला की त्याला आपण सुख म्हणतो.

संत महात्मे ह्या अवस्थेला समाधी म्हणतात असं मला वाटतं. समाधी अवस्थेत त्यांना मिळणाऱ्या आनंदाची वर्णने माझ्या ह्या मानसिक स्थितीत असतानाच्या अनुभवाशी तंतोतंत जुळतात. मग मला कुणाचीच पर्वा नसते आणि ते रंजक प्रसंग कागदावर उतरतात. जसा मुक्त छंद तसा हा माझा स्वच्छंद.....!! स्वांत सुखाय.

 

- सी. एल. कुलकर्णी 


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि