Id SKU Name Cover Mp3
सुरेख पत्र प्रिय दीपा


60 118
Download Bookhungama App

सुरेख पत्र प्रिय दीपा - राजा मंगळवेढेकर

Description:

पत्रात मन मोकळं करता येतं. अप्रत्यक्ष संवाद साधता येतो. पत्रांना एक प्रकारचा अनौपचारिकपणा असतो. म्हणूनच पत्रभेट महत्त्वाची. मला माझ्या भटकंतीत जो आनंद लाभला त्या आनंदात सगळ्या बालमित्रांना सामील करून घ्यावं, या सदिच्छेनंच ही पत्रं लिहिली.ता. क. (ताजा कलम) गेली तीस-पस्तीस वर्षं मी भारतभर भटकतोच आहे. मराठी मुलुखात तर माझी मुशाफिरी बाल मित्र-मैत्रिणींना गोष्टी- गाणी सांगण्यासाठी, सततच सुरू असते. या भटकंतीत बालदोस्तांनी तर मला खूप दिलं - शिकवलंच, पण विविध ठिकाणचं लोकजीवन, समाजजीवन, न्याहाळायला मिळालं. विविध ठिकाणचं निसर्गसौंदर्य, स्थळदर्शनही घडलं. लोकस्मरणातल्या आख्यायिका, दंतकथा, गीतं ऐकायला मिळाली. चालीरीती, रीतभात, जत्रा, यात्रा, सण-उत्सव.... खूपच समजून घेता आलं. पोतडीत साठत गेलं. प्रिय दीपा आणि प्रिय सौमित्र या नातवंडांच्या निमित्तानं साऱ्या मराठी मुलुखातल्या नातवंडांना-पतवंडांना ते द्याव म्हणून ही पत्रं. पत्र हा साहित्य प्रकार मोकळा-ढाकळा, लवचिक व आप्तभाव जागवणारा आहे. जिव्हाळा, स्नेह उत्पन्न करणारा व प्रेमलोभ वाढविणारा आहे. पत्रात मन मोकळं करता येतं. अप्रत्यक्ष संवाद साधता येतो. पत्रांना एक प्रकारचा अनौपचारिकपणा असतो. म्हणूनच पत्रभेट महत्त्वाची. मला माझ्या भटकंतीत जो आनंद लाभला त्या आनंदात सगळ्या बालमित्रांना सामील करून घ्यावं, या सदिच्छेनंच ही पत्रं लिहिली. साने गुरूजींनी अशी ‘सुंदर पत्रं’ लिहिली होती. मी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून ‘सुरेख पत्रं’ लिहिली. तुलना होऊ नये, भाव केवळ जाणून घ्यावा. गुरूजी ते गुरूजीच! या माझ्या सुरेख पत्रांनी सगळ्या मराठी मुलुखाताच बालमित्र-मैत्रिणींना भरभरून आनंद द्यावा. त्यांचे भाव पोषण व्हावे आणि निसर्ग-मानव मैत्रीसाठी त्यांच्याही पायाला पंख फुटावेत, हीच अपेक्षा! राजा मंगळवेढेकर


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि