40 120
Download Bookhungama App

सुरस गोष्टी - मनोज दास

Description:

लेखक मनोज दास यांच्या लीलावती भागवत यांनी अनुवादित केलेल्या कथा.राजा आणि खार एक होता राजा. त्याला आपण सर्वश्रेष्ठ आहो याचा फार अभिमान वाटत असे. राजा तरुण होता, विद्वान होता, बुद्धीमान होता एवढेच नव्हे तर त्याचे सामर्थ्य आणि शौर्य यांची बरोबरी करणारा एकही तरुण त्याच्या राज्यात नव्हता. शिवाय त्या राज्यातला तो सर्वांत श्रीमंत मनुष्य समजला जात असे. एक दिवस तो असाच आपल्या बागेत हिंडत होता. त्याच्याबरोबर होता त्याचा शहाणा म्हातारा प्रधान. राजा प्रधानाला म्हणाला, “प्रधानजी, मला नाही वाटत माझ्यासमोर कुणी येऊन मला म्हणेल की “राजा मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कुणाला धीरच होणार नाही असं म्हणायचा. मी सर्वच बाबतींत इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे हे पाहून मला इतका आनंद होतो.” म्हातारा प्रधान, हा तरुण राजा जे काय म्हणे त्याला कधीच विरोध करीत नसे. त्याने काहीच उत्तर दिले नाही. तो नुसता हसला देखील नाही. राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला, “प्रधानजी तुम्ही असे गप्प का?” प्रधान हसून म्हणाला, “महाराज, खरं सांगू का, आपल्यापुढे कुणीही प्रौढी मिरवणार नाही याबद्दल कुणी कधीच खात्री बाळगू नये. राज्यात तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात हे कबूल, पण काही लोकांना हे माहीत नसण्याची शक्यता आहे. प्रत्येकजण स्वतःला श्रेष्ठच समजतो. आपण नेहमी बघतो नाही का, की एखादा रडतराऊत सुद्धा स्वतःला वीरशिरोमणी समजतो. तेव्हा राजेसाहेब, तुमच्या श्रेष्ठपणाची कल्पना नसलेलं कुणी एखादे दिवशी तुमच्यासमोर स्वतःची प्रौढी मिरवणं शक्य आहे. पण दुसऱ्यांच्या या प्रौढी मिरवण्याकडे लक्ष देणं म्हणजे स्वतःची मनःशांती बिघडवून घेण्यासारखं आहे.” प्रधानाचे हे बोलणे चालू असतानाच एक पिटुकली खार टुणकन् उडी मारून तेथे आली आणि त्यांच्यासमोरच एका संगमरवरी खांबावर चढून बसली. खारीने आपल्या पुढच्या पायात धरले होते एक नाणे, अगदी राजाला आणि प्रधानाला दिसेल असे.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि