60 116
Download Bookhungama App

सुफळ संपूर्ण - क्रांती साडेकर

Description:

’ सुफळ संपूर्ण हा ‘महाराष्ट्र टाईम्स’ या मराठीतील आघाडीच्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह आहे. ‘Sufal Sampurn’ is a compilation of articles published in leading Marathi news paper ‘Maharashtra Timesप्रकाशकाचे मनोगत  गोष्टी सांगणं आणि ऐकणं ही फार पूर्वी पासून चालत आलेली परंपरा आहे. माणसाचा स्वभावाच गोष्टीवेल्हाळ आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये. व्रत-वैकल्याच्या श्रावण महिन्यात व्रत कथा ऐकणं हा महत्वाचा भाग. कालानुरूप अनेक बदल होत गेले आणि परंपरा मागे पडत गेल्या. त्यात ही परंपराही काही मागे पडल्या सारखी वाटते. हा उल्लेख करण्याचे कारण की, याच श्रावणातल्या कथांच्या स्वरूपामध्ये क्रांति साडेकर यांनी या संग्रहातील कथा लिहिल्या आहेत. त्यामुळे या कथा वाचताना लिखाणातील संवाद सहजच आपल्या मनाला स्पर्शून जातो. ज्या मनोभावे स्त्रिया ही व्रत वैकल्ये करतात त्याच भावनेने लिखाणाचे जणू व्रतच घेऊन त्या व्रताच्या कथा क्रांती साडेकर सांगतात असे भासते. मात्र या कहाण्या देवी देवतांच्या किंवा चमत्कारांच्या मुळीच नाहीत. या कहाण्या मानवी स्वभावाच्या आहेत. छोट्या छोट्या बदलांनी आयुष्य आनंदी कसे करावे याचे गुपित सांगणाऱ्या आहेत. रोजच्या जीवनात साडेकर यांना जे भावलं, दिसलं ते सध्या सोप्या प्रवाही शैलीत त्यांनी मांडले आहे.


Format: ePub

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि