40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान मे २०१ ८ - विविध लेखक

Description:

सृष्टिज्ञान

ध्याससृष्टिज्ञानचा, कास विज्ञानाची, आस समृद्धीची  !संपादकीय : अंतराळ पर्यटन

 मे महिना म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आणि सुट्टी म्हणले की गावाला जायचे असे हे घट्ट समीकरण झालेले आहे. प्रवासासाठी विविध वाहनांच्या आरामदायी सोयी, संगणकाद्वारे प्रवासाची, राहण्याची आरक्षणं करण्याची घरबसल्या सोय, सहजपणे वैविध्यपूर्ण खाणेपिणे मिळण्याची भरपूर ठिकाणे, गुगल नकाशावरून रस्ते आणि वेगवेगळी ठिकाणे शोधण्याची सहजता, संपर्कासाठी हातात मोबाईल अशा अनेक विज्ञान तंत्रज्ञानातील सोयीसुविधांनी देशविदेशात पर्यटन करणे अधिक सोपे आणि आरामदायी झाले आहे. पर्यटनासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातील ठिकाणे शोधली जातात. काही स्थळे तर विज्ञान पर्यटनस्थळे म्हणूनही नावाजली आहेत. कारण त्या ठिकाणी काही वैज्ञानिक अविष्कार पहायला मिळतात. उदा. लोणार सरोवर, यलोस्टोन नॅशनल पार्क इ. पृथ्वीवरील पर्यटन ठिकाणांनंतर आता माणसाला अवकाश पर्यटनाचे वेध लागले आहेत, त्यासंबंधीची एक बातमी वाचण्यात आली.

स्पेस एक्सनावाची कंपनी एलन मस्क या कल्पक माणसाने 2002 मध्ये स्थापन केली आणि आता 2018 मध्ये स्पेस एक्स तर्फे सुरुवातीला दोन प्रवाशांना चक्क चंद्रावर नेऊन आणण्याची जोरदार तयारी चालू आहे. त्यासाठीफाल्कन नऊ (9)’ हा अग्निबाण सज्ज होतो आहे.

एलन मस्क या अतिश्रीमंत माणसाने अवकाशातील पर्यटनाचे स्वप्न पाहिले आहे. त्यासाठी त्याने स्वस्तात वेगाने अवकाशात अतिदूरचे अंतर पार करणारीफाल्कनअग्निबाणाची मालिकाच तयार केली आहे. द्रव इंधनावर चालणारा अग्निबाण सोडणारी खाजगी कंपनी, असा नावलौकिक स्पेस एक्सने 2008 मध्ये मिळवला.

स्पेस एक्सने आत्तापर्यंत 38 उड्डाणे केली. त्यानंतर नऊ वर्षात म्हणजे 2017 मध्ये एकदा वापरलेला अग्निबाण पुन्हा वापरण्याचे प्रगत तंत्रज्ञान विकसित केले. या नव्या तंत्रज्ञानाने अवकाश प्रवासाचा खर्च नक्कीच कमी होईल, असा एलन मस्कला विश्वास वाटतो.

स्पेस एक्सने बनविलेलीमर्लिन इंजिन्सही आत्तापर्यंत तयार केलेल्या इंजिनांमधील सर्वात शक्तिशाली इंजिन्स आहेत. अशी नऊ इंजिन्स पहिल्या टप्प्यात वापरली जातात. अग्निबाणासाठी लागणाऱ्या उच्च दर्जाचे केरोसिन आणि द्रव ऑक्सिजन यांचे मिश्रण या इंजिनांमध्ये भरले जाते. तर दुसऱ्या टप्प्यात एकच मर्लिन इंजिन अवकाशातील पोकळीत पेट घेऊ शकेल, असे त्यात परिर्वतन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील नऊ इंजिन्सपैकी दोन जरी निकामी झाली तरी उड्डाणात बाधा येत नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

अशा तऱ्हेने स्पेस एक्स ही खाजगी कंपनी स्वतः शोधलेल्या तंत्रज्ञानाने लोकांना अवकाशात घेऊन जाण्याच्या तयारीत आहे. भविष्यात हे गृहस्थ लोकांना मंगळावरही घेऊन जाण्याचे स्वप्न पाहत आहेत. त्यात स्पेस एक्सचीइंटरप्लॅनेटरी ट्रान्सपोर्ट सिस्टीम (आयटीएस)चा अंतर्भाव आहे. त्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत अंतराळयान थांबविण्यासाठी 1,000 थांबे असतील. प्रत्येक थांब्यावर 100 लोकांचा गट असेल. पुढच्या 50 ते 100 वर्षात एक दशलक्ष लोकांना मंगळवारीघडवून आणण्याची मस्क यांची महत्त्वाकांक्षा आहे. अर्थात हा प्रवास नक्कीच सोपा नाही. यानातून मंगळावर उतरणं सर्वांना पुरेसे अन्न, पाणी पुरविणे. त्यांच्या तब्येतीची काळजी घेणे, असे कितीतरी लहान मोठे आव्हानात्मक प्रश्न असणार आहेत. अर्थात हे अंतराळ भेट-स्वप्न म्हणजे विज्ञानाच्या मदतीने केलेली प्रश्न-शोध-यात्रा असणार आहे. या प्रश्नांवर मात करणं म्हणजे विज्ञान संशोधनात पुढचं पाऊल टाकणं आहे.

नाही तरी म्हणलेच आहे. केल्याने देशाटन, मनुजा चातुर्य येतसे फार. विज्ञान पर्यटनाने, केवळ चातुर्य नाही, तर माणसाच्या अंतराळ विज्ञान आकलनातही नक्कीच भरच पडणार आहे.

कविता भालेराव,

कार्यकारी संपादक


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)