40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान फेब्रुवारी २०१ ८ - विविध लेखक

Description:

 

‘सृष्टिज्ञान’ हे एक वैज्ञानिक मासिक आहे. सुमारे ९० वर्षांपूर्वी प्रा. गोपाळ रामचंद्र परांजपे यांनी दिनांक १ जानेवारी, १९२८ ला ‘सृष्टिज्ञान’ हे मासिक सुरु केले.

 संपादकीय
विज्ञानप्रसारासाठी ‘देशीभाषेचा महिमा

 

नुकताच कोलकत्याच्या एसएननॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस या संस्थेने प्रोसत्येंद्रनाथ बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त मोठा कार्यक्रम केलाया कार्यक्रमाचे उद्घाटन मापंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेत्यावेळी मापंतप्रधानांनी विज्ञान संशोधनाचा प्रसार करण्यासाठी देशी भाषा वापरात्यामुळे विद्यार्थी आणि तरुणांमध्ये विज्ञानविषयक रूची निर्माण होईलतसेच भाषा ही अडथळा न बनता विज्ञान-प्रसारासाठी साह्यभूत बनली पाहिजेअसे शास्त्रज्ञांना आवाहन केले.

भाषा आणि विज्ञान यांचे संबंध दृढ होणे फार गरजेचे आहेहा महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने मापंतप्रधानांकडून अधोरेखित झालात्यामुळे एकूणच ‘सृष्टिज्ञानसारखी प्रादेशिक भाषेमध्ये विज्ञानप्रसाराची कामे करणारी मासिकेनियतकालिके यांचे महत्त्वच पंतप्रधानांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहेयाचा आम्हाला खरोखर आनंद वाटतो आहे.

देशभरातील लहानमोठ्या आधुनिकअत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये मोठ्या जोमाने विविध विषयांवर संशोधन होत आहेप्रयोगशाळांच्या बंदिस्त जागेतशोधलेले नवे गुणकारी औषध किंवा एखादे उपयुक्त उपकरण किंवा एखादे मूलभूत वैज्ञानिक तत्त्व केवळ वैज्ञानिकांपुरतेच राहिले आणि लोकांपुढे गेले नाही तर तो देशवासीयांवर अन्याय केल्यासारखे होईलत्याचबरोबर नवे शोध लोकांपर्यंत योग्य प्रकारे पोहोचले तरच संशोधकांच्या कष्टाचे खरे चीज होईललोकांच्या आयुष्यात चांगले बदल घडवून आणण्याचे सामर्थ्य अभिनवकल्पक संशोधनामध्ये नक्कीच आहेवैज्ञानिकांच्या संशोधनाने एखाद्या गरीब माणसाचे आयुष्य त्याला सुसह्य होण्यासत्याचबरोबर सर्वांच्याच अडचणी कमी करण्यात हे संशोधन साहाय्यकारी ठरावे अशीच अपेक्षा असतेत्यासाठी संशोधन विषयही नेमके निवडायला हवेतअसेही पंतप्रधनानांनी आपल्या भाषणात नमूद केले.

आता विज्ञान हे आंतरज्ञानशाखांमध्ये विस्तारले गेले आहेत्यामुळे ते केवळ मूठभर लोकांपुरते राहाता कामा नये तर ते सर्वदूर पोहोचले पाहिजेसमाजशास्त्रअर्थशास्त्रसंख्याशास्त्र इविषयांशी आता विज्ञान जोडले गेले आहेम्हणूनच विज्ञानाचा प्रसार समाजातील सर्व थरांतील लोकांसाठी व्हायला हवातरच विज्ञानामुळे होणारे सकारात्मक बदल लोकांना कळतीलत्याचबरोबर विज्ञानातील काही संशोधन हे दूरगामी दुष्परिणाम घडविणारेही असू शकतेहाही विचार लोकांपर्यंत पोहोचेलविज्ञान संशोधनाच्या या दोन्ही बाजू समजून देण्याची कुवत देशीभाषांमध्ये किंवा स्थानिक भाषेत असतेअसे घडले तरच भाषा आणि विज्ञान एकमेकांना पूरक असतात हे वास्तव लक्षात येईलअन्यथा विज्ञानाधिष्ठित समाज तयार झाला पाहिजेअसे विचार हे पोकळ बडबड ठरू शकतात.

 


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)