40.00 100.00
Download Bookhungama App

सृष्टिज्ञान एप्रिल २०१८ - विविध लेखक

Description:

ध्याससृष्टिज्ञानचा, कास विज्ञानाचीआस समृद्धीची!मागच्या महिन्यात, 14 मार्च या दिवशी महान भौतिकशास्त्रज्ञ डॉ. स्टीफन हॉकिंग यांचे निधन झाले. गेली 55 वर्षे सर्व प्रकारच्या शारीरिक विकलांगतेवर मात करत ते विश्वरचनेचे रहस्य शोधण्यात मग्न होते. प्रखर बुद्धिमत्ता आणि त्यापेक्षा कांकणभर जास्त कणखर मन यांच्या जोरावर हा अलौकिक वैज्ञानिक शेवटपर्यंत संशोधनात मग्न राहिला. विश्वाचे गूढ उकलण्याच्या त्यांच्या ध्यासाला विश्वाच्या भवितव्याच्या चिंतनाची जोड होती. आईनस्टाईन यांच्या नंतरचा मोठा शास्त्रज्ञ अशी किर्ती लाभलेल्या हॉकिंग यांचे जीवन चरित्र सर्वांसाठी खूपच स्फूर्तीदायक आहे. कोणत्याही क्षेत्रात काम करा, त्याला दुर्दम्य आशा, असामान्य जिद्द, अथक परिश्रम आणि असीम कार्यनिष्ठेची जोड दिली तर ते काम उत्तमच होईल, असा विश्वास आणि प्रेरणा त्यांच्या चरित्रातून मिळते. म्हणूनच केवळ विज्ञान क्षेत्रातील नव्हे तर सर्वसामान्यांपर्यंत स्टीफन हॉकिंग यांचे नाव आणि त्यांचे विचार पोहोचले.

या अंकात डॉ. हॉकिंग यांच्यासंबंधी दोन लेख प्रसिद्ध करत आहोत. एक त्यांच्या संशोधन कार्याविषयी तर दुसरा त्यांना आयुष्यभर ग्रासलेल्या आजाराविषयी आहे. डॉ. स्टीफन हॉकिंग यांना सृष्टिज्ञान परिवारातर्फे शतशः प्रणाम!


Format: Adaptive

Publisher: महात्मा फुले वस्तुसंग्रहालय (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)