0
Download Bookhungama App

सृजन खाऊगल्ली विशेषांक - ऑक्टोबर २०१५ - संपादक - नेहा कुलकर्णी

Description:

सृजन खाऊगल्ली विशेषांक - ऑक्टोबर २०१५ - देशी विदेशी विवध पाकाकृतिनी सजलेला अंक. हा अंक केवळ पाककृतीचे साहित्य आणि पाककृती एवढेच देत नाही तर त्यासोबत मनोरंजक माहिती सुद्धा देतो. म्हणूनच हा अंक केवळ खाद्यपदार्थ बनविण्यात रस असणाऱ्यासाठीच नाही तर खवैयांसाठी सुद्धा वाचनीय आहे.सप्रेम नमस्कार मंडळी, इ-सृजन खाऊगल्लीत तुमचं स्वागत आहे ! डिजिटल वाचन संस्कृती मराठी वाचकाला नवी नाही मात्र इंग्रजीच्या तुलनेत मराठी साहित्य विश्वात अजूनही म्हणावी तितकी ती रूळलेली नाही. पुस्तक म्हणजे मुद्रीत हेच समीकरण आजही लेखक आणि वाचकांच्या मनात पक्कं आहे. इको फ्रेंडली वाचन ही काळाची गरज असून सृजननं जाणिवपूर्वक यात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. यातूनच इ-बुक्सच्या निर्मितीचा विचार रूजला. विविध विषयांवरील अनेक इ-बुक्सची निर्मिती केल्यानंतर वाचकांपर्यंत सृजन नियमितपणे पोहोचावं यासाठी त्रैमासिकाची वाट निवडली. याचंच पुढचं पाऊल म्हणजे आता मासिकाच्या रूपानं दर महिन्याला इ-सृजन वाचकांच्या भेटीला येत आहे. याची सुरुवात श्रावण विशेषांकानं झाली आणि आता दुसरा खाऊगल्ली विशेषांक तुमच्या हाती आहे. वाचकहो, आपण सृजन कुटुंबाचे अविभाज्य घटक आहात. आपला लोभ आहेच, तो असाच ठेवा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चांगला उपक्रम पोहोचविण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. आपल्या फेसबुकवर याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा, परिचित आणि मित्रमंडळालाही यात आवर्जून सहभागी करून घ्या. आपल्यापैकी जे इ-सृजनसाठी लेखन करू इच्छितात त्यांनी या अंकात दिलेल्या इ मेल वर संपर्क साधावा. सर्वच रूजलेल्या आणि नव्या लेखकांचेही सृजन अत्यंत आनंदानं स्वागत करत आहे. ही एक इको फ्रेंडली वाचन चळवळ म्हणून आपण सगळे यात सहभागी होऊया ! संपादक


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि