60.00 116.00
Download Bookhungama App

स्नेहदग्ध - सी. एल. कुलकर्णी

Description:

कवितांना निसर्गाच्या सामान्य प्रतिक्रियेचे नियम लागू पडत नाहीत. आंब्याला आंब्याचीच फळं. हापूसला हापूस, पायरीला पायरी, केशरला केशर असं इथे होत नाही.मनोगत

अस्तित्त्वाच्या आवरणांनी झाकून टाकलेलंस्वत्वजागं होतं. तेव्हा त्याला अनेकविध व्यथावंचनांनी घेरलेलं असतं. हरवलेली वाट शोधताना ते त्रस्त होतं आणि अस्वास्थ अंदोलू लागतं. ह्या आंदोलनांना एखादी शीळ ऐकू येते, प्रतिभा साद देते, मग दिशा सापडते आणि श्रमपरिहाराची साथ गवसते.

आठवणींचा घाट, विस्मरलेली पहाट, मायेचा काठ, गणगोतांचा थाट, सारं सारं उत्कट होतं आणि विचारांचा प्रवाह; लय-लास्य-छंद वृत्तांना बिलगून शब्दरूप घेतो.

जन्माला येणारं बाळ जन्मदात्यानुरूप आणि परिस्थितीचे संदर्भ घेऊन जन्माला आलेलं असतं. त्याचा चेहरा-मोहरा, रंग-रूप, भाव-स्वभाव, घराणेदार असतात, तरीही त्याची स्वतःची अशी स्वतंत्र व्यक्तिरेखा घडते, कारण तिच्यावर वेळोवेळी; सामाजिक नैमित्तिक प्रभाव अंकित होत असतात.

कवितांना निसर्गाच्या सामान्य प्रतिक्रियेचे नियम लागू पडत नाहीत. आंब्याला आंब्याचीच फळं. हापूसला हापूस, पायरीला पायरी, केशरला केशर असं इथे होत नाही.

त्या त्या प्रसंगी लगडलेले शब्द स्वतंत्र संस्कारांनी मढलेले असतात आणि प्रत्येकवेळी वेगवेगळी गर्भितं उलगडत येतात. म्हणून प्रत्यक्ष संपर्क नसूनही तुमच्याशी बोलतात, अंतरंगात हिंडतात फिरतात, सासरी रुळलेल्या नववधूसारखे सहज नकळत वावरतात.

शब्दांच्या ह्या रंग गंध मंडित पागोळ्या आपल्यातल्या सकस वत्सल माती पायी, हृद्य समर्पित.

 

- चारुदत्त लक्ष्मण (सी. एल.) कुलकर्णी


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि