Id SKU Name Cover Mp3
स्मृतिचित्रे


80 144
Download Bookhungama App

स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक

Description:

लक्ष्मीबाईचे जीवनच अद्‌भुतरम्य होते. त्यांनी तुमच्या नजरेपुढे पन्नास वर्षांचा चित्रपट उलगडला आहे. वाचता वाचता डोळे पाणावतील. अश्रू वाहू लागतील असे हे पुस्तक आहे.- प्रकाशकाचे निवेदन - मराठीतील एक अक्षर - साहित्य येथे वाचकांना सादर करताना मला फार आनंद होत आहे. तळटीपांसह ही आवृत्ती मला सादर करता आली नाही. तरीही मुळातील ग्रंथाची गोडी सर्वांना चाखता येईलच. जोपर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत हे पुस्तक टिकेल व वाचले जाईल. कितीही वेळा वाचले तरी प्रत्येक वेळा या पुस्तकाच्या सौंदर्याचा नवीनच अंगाने साक्षात्कार घडतो. माझ्या पत्नीने हे पुस्तक किती वेळा वाचले याला गणतीच नाही. ग्रंथालयातून पुस्तक आणून वाचून परत केल्यानंतर जे पुस्तक विकत घेतले तेच हे पुस्तक. लक्ष्मीबाईचे जीवनच अद्‌भुतरम्य होते. त्यांनी तुमच्या नजरेपुढे पन्नास वर्षांचा चित्रपट उलगडला आहे. वाचता वाचता डोळे पाणावतील. अश्रू वाहू लागतील असे हे पुस्तक आहे. या पुस्तकासंबंधी, गंगाधर गाडगीळांपासून अनेक सुप्रसिद्ध लेखकांनी विस्तृत समीक्षा लिहून ठेवली आहे. तेव्हा त्याबद्दल मी जास्त काय लिहू? ह. अ. भावे (फेब्रु १९८७) २४ फेब्रुवारी १९८७ रोजी स्मृतिचित्रांची नवी आवृत्ती मी प्रकाशित केली. प्रकाशन दुर्गा भागवत यांचे हस्ते झाले होते. मराठीतील या अक्षर साहित्याची दोन वर्षांच्या आतच पुन्हा आवृत्ती काढण्याचा योग आला याचा मला आनंद वाटतो. ह. अ. भावे ( जाने. 1989 )


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि