30.00 58.00
Download Bookhungama App

श्री शनिदेव -

Description:

श्री शनिदेव

शनि हा त्याच्या वक्रदृष्टीच्या अनुषंगानेच अधिक परिचित आहेकारण संहारक-विदारक शक्तिला भयापोटी नमस्कार करण्याचा मनुष्यस्वभाव आहे.

देवतांनाही पीडा देऊन शनिने आपले वर्चस्व सिद्ध केले.

किंबहुना शनिचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच मोठमोठ्या देवताही त्याच्यापुढे लहान झाल्या.

परंतु शनी हा प्रसन्न होणाराही देव आहेसाडेसातीच्या शेवटी विक्रमादीत्यास तो प्रसन्न झाला होताप्रभू रामरायाचे पिताश्री राजा दशरथ यांना तो प्रसन्न झाला होता.

जे लोककल्याण करतातशिवभक्ति करतातगुरुभक्ति करतातजे विश्वाची चिंता वाहातातत्यांच्याकडे वक्रदृष्टीने पाहाण्याचे शनिस कोणते कारणच नाहीउलट त्यांच्यावर शनीची विशेष कृपाच असते.

कोणत्या कारणांनी शनी आपल्यावर रागावतो?

शनिस प्रसन्न करणारी सत्कर्मे कोणती?

शनिसह इतर ग्रहांची प्रसन्नताही कशी राखावी?

 

शिवाय नक्षत्रफलासह इतर भरपूर उपयुक्त माहितीकरीता प्रत्येकाने घेतलाच पाहिजे असा हा बालग्रंथ!!प्रकाशनाविषयी

विश्वभरात विशेषतः भारतीय संस्कृतिची मूल्ये नष्टप्राय होतांना दिसत आहेत. पाश्चिमात्य संस्कृती जीवनाचा आदर्श ठरून जीवन अमूलाग्र बदलून जाताना अनुभवत आहोत. त्याचबरोबर व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक स्तरावर संस्कृतिविहीनतेची लक्षणं दिसू लागली आहेत. ‘पेरल्यासारखे उगवते व बोलल्यासारखे उत्तर येतेहा या सृष्टीचा नियम आहे. त्यामुळे समाजात आज दिसणाऱ्या गोष्टी पूर्वीच्या कर्मांचाच परिपाक आहे. जशी कर्मे तसे अनुभव जीवनामध्ये अनुभवावे लागतात.

अचानक धननाश होणे, कालचे कोट्याधीश आज रस्त्यावर येणे, हत्या होणे, दरोडा पडून घर लुटले जाणे, दिवाळखोरी, फसवणूक, अपघात, अपमृत्यू, लहानवयातच दुर्धर रोग लागणे, कॅन्सर होऊन अपरिमित वेदना अनुभवाव्या लागणे, रोगराई व औषधपाण्यासाठी अफाट खर्च होणे, न समजणारे विचित्र रोग होणे, औषधे लागू न पडणे, चोरीचा आळ येणे, पोलीस अधिकारी किंवा सरकारी अधिकाऱ्याकडून अकारण छळ होणे, देशोधडीला लागणे, वरवर पाहाता खूप मिळकत असून जीवनात स्थिरता शांतता अनुभवायला न मिळणे, ही आणि अशी कितीतरी दुःखे आपणभोग आहेतअसे म्हणून बोळवण करत असतो. पण ही सर्व कर्माची फळे असतात. याशिवाय पाऊस वेळेवर न पडणे, कमी वा अधिक पडणे, पिकांवर रोग पडणं, गारपीट होऊन उभे पीक हातून जाणे, स्त्रियांची अब्रू राखली न जाणे, चोऱ्या, खून यासारख्या गुन्हेगारीचे साम्राज्य येणं, नद्यांच पाणी नाहिसं होणं, राज्यकर्ते व प्रजाजन यांनी केलेल्या निषिद्ध कर्मांची फळं असतात. दरिद्रता, गरिबी, धंदापाणी ठप्प होणं, रोग लागणे, अचानक मृत्यू येणं अशा घटना माता व वृद्ध यांची सेवा न करण्यामुळे, पितृपीडा यामुळे घडत असतात. क्षमता असूनही नियोजन न होणे, बुद्धि भ्रष्ट होणे, ही सर्व केवळ दुर्दैवाची नव्हे, तर पुण्यक्षय मोठ्याप्रमाणात झाल्याची लक्षणे असतात.

ही अशी लक्षणं निर्माण झाली तर ती अयोग्यकर्मे थांबवणे हे पहिले कर्तव्य असते. ही कर्मे कोणती ते सांगण्यासाठीच या पुस्तकांची निर्मिती झालेली आहे. पॅथॉलॉजी रिपोर्टप्रमाणे रोग कळण्यासाठी व उपचार करता येण्यासाठी हे साहित्यच खऱ्या अर्थाने उपयोगी पडू शकेल. वेळ पैसा व मनुष्यदेहाचे आयुष्य वृथा खर्ची पडेल. पूर्वीच्या कर्मांमुळे आजचे दुःखमय जीवन आपल्या वाट्याला आले. त्यामध्ये अनावश्यक व वाईट कामे करून अधिकाधिक गुंतागुंतीची कर्मे घडत आहेत. पुढच्या काळात जीवन जगणे आजपेक्षा कैकपटीने असुरक्षित व दुःखमय असेल. ती वेळ येऊ नये व सर्वांनी वेळीच सावध व्हावे यासाठी ही पुस्तके घरोघरी पोहोचून त्यानुसार आचरण होणे आवश्यक आहे. अन्यथा पुढच्या काळात नाती नष्ट होऊन एकमेकांच्या उरावर बसून पशुतुल्य वर्तन अनुभवावे लागेल. यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ संस्कृति टिकविण्यासाठी सहाय्य करा. स्वतः आचरण करा व दुसऱ्याला आचरण करायला सहाय्य करा.

यज्ञ करा त्याशिवाय पाऊस पडणार नाही. अन्नाशिवाय जीवन जगता येणार नाही पैसा असून उपयोग होणार नाही.

अन्नाद्भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसंभवः।

यज्ञात्भवति पर्जन्यो यज्ञः कर्मसमुद्भवः।।

... भगवत् गीता (/१४)

 

या श्लोकातून सर्व रहस्य स्पष्टपणे मांडले गेले आहे. हे ज्ञान पृथ्वीतलावरील सर्व जाती, वर्ण, पंथांसाठी सारखेच आहे. हे निसर्गाचे नियम आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवा. जीवन जगण्यासाठी सहाय्यकारी व्हा. कोटी-कोटींचे आशीर्वाद घ्या


Format: Adaptive

Publisher: Pawanai Publication (इ-बुक सृजन ड्रीम्स प्रा. लि.)