60 110
Download Bookhungama App

श्रमदेवतेचे पुजारी व्हा - ह. अ. भावे

Description:

युवकांना व युवतींना श्रमाचे महत्त्व पटावे, त्यांनी श्रमदेवतेची उपासना सुरूकरावी या विषयी सल्ला आणि मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहेप्रस्तावना श्रमदेवता ही उपासनेला निश्चितपणे पावणारी देवता आहे. पण ही उपासना मेहनतीचीच असावी लागते. या देवतेला घामाचीच फुले वहावी लागतात. आपल्या देशात अनेक लोक हाताने श्रम करणे कमीपणाचे मानतात. पण वैभवसंपन्नता श्रमातूनच निर्माण होते. महात्मा गांधींनी श्रमाचे महत्त्व जाणले होते. महात्मा गांधी स्वतः संडास साफ करत व कुष्ठरोग्यांची सेवा करीत असत. एकदा विनोबाजी बापूजींना भेटायला गेले. गांधीजी आश्रमाच्या स्वयंपाकघरात भाजी चिरत होते. महात्माजींनी विनोबाजींच्या समोर भाजीची जुडी टाकली आणि म्हणाले, “भाजी निवडायला लागा. निवडतानिवडता चर्चा करू.” गांधींच्या आश्रमात सर्व सत्याग्रहींना सफाईची कामे करावी लागत. गांधींच्या लेखी श्रमप्रतिष्ठाच सर्वात महत्वाची होती. श्रमातून अनुभव मिळतो. श्रम करणाराच आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहतो. ज्याला दारिद्र्य दूर ठेवायचे आहे व यश मिळवायचे आहे, त्याने श्रम देवतेलाच प्रसन्न करून घेतले पाहिजे. ही श्रम देवता म्हणजे मोठे कडक दैवतआहे. श्रमा शिवाय इथे दुसरा कसलाच वशिला चालत नाही. श्रमदेवतचे मंदिर नाही. रवींद्रनाथ टागोरांनी म्हटल्या प्रमाणे, 'जेथे शेतकरी उन्हातान्हात घाम गाळतअसतो, कारखान्यात जेथे श्रमिक आपल्या हाताचे कौशल्य दाखवतो, तेथेच या श्रमदेवतेचे वास्तव्य असते. '' तुकारामांच्या शब्दांत बदल करून सांगायचे झाले तर, '' कष्टास म्हणेजो आपुला । देव तेथेचि जाणावा।” हे पुस्तक म्हणजे श्रम प्रतिष्ठे विषयी ओरिसन स्वेटमॉर्डेनने केलेल्या विचारांचे संकलनआहे. हे विचार ओरिसन स्वेटमॉर्डेनच्या निरनिराळ्या सहा पुस्तकांतून संकलित केले आहेत. त्या सहापुस्तकांची नावे अनुक्रमणिकेत दिलेली आहेत. नवभारताची उभारणी करणाऱ्या तरुणांनी कोणत्याही कष्टाची कधीच लाज वाटू देऊ नये. भारताचे थोर नेते जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेतील शिक्षण कष्टाची व मजुरीची कामे करून पूर्ण केले हे तुम्हाला माहीत असेलच. अमेरिकेचा सर्वोत्तम अध्यक्ष लिंकन वयाच्या १८व्या वर्षी लाकडे फोडण्याचे व जंगल तोडण्याचे काम करीत असे. युवकांना व युवतींना श्रमाचे महत्त्व पटावे, त्यांनी श्रमदेवतेची उपासना सुरू करावी हाच या पुस्तकाचा हेतू आहे.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)