Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे - प्रभाकर भावे

Description:

शिवरायांचे शिलेदार बाजीप्रभू देशपांडे यांचे चरित्र.पिचेल मनगट परी उरातील अभंग आवेश! ।शत्रूकडील कुणाचा तरी एक घाव अकस्मातपणे सपकन् बाजींवर पडला; बाजींची मूर्ती कोसळली! तरीही, रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत, घामाच्या अखेरच्या बिंदूपर्यंत, अन् अखेरच्या श्वासापर्यंत, त्यांच्या मनात एकच तळमळ घर करून होती. शिवाजीराजे किल्ले विशाळगडी सुखरूप पोहोचल्याचे तोफांचे आवाज ऐकण्यासाठी कानांत जीव एकवटून ऐकायला ते आतूर झाले होते. तोच धडाडऽ! धडाऽ!ऽ!! ड असे इशारे झाले. अन् गजापूरची घोडखिंड “पावन” झाली. बाजीप्रभूंनी आपला अखेरचा श्वास तेथे सोडला, त्यांनी आपल्या प्राणांचे बिल्वदळ स्वराज्यासाठी अर्पण केले, शिवशंभूला वाहिले. अन् आजही ही गजापूरची पावनखिंड छातीवर हात ठेवून या जाज्वल्य राष्ट्रप्रेमाची, स्वराज्यप्रेमाची, स्वातंत्र्याच्या इर्षेची साक्ष देत आहे.।।


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)