Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार प्रतापराव गुजर


30.00 56.00
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार प्रतापराव गुजर - प्रभाकर भावे

Description:

प्रतापराव गुजर यांचे चरित्र.त्रिवार मुजरा! त्रिवार मुजरा!! त्रिवार मुजरा!!! महाराजांच्या लष्करी धोरणांचा विचार करताना ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे त्यांची योजनाबद्धता, अभ्यास, स्मरण, तर्क, निरीक्षण. आणि काळ, काम वेगाचा प्रमाणबद्ध विवेक धरून अगदी काटेकोर योजना करावी महाराजांनीच! उत्कृष्ट योजना म्हणजे निम्मे यश! आधीच ते योजना करीत. योजनेची योजना देखील पूर्वनियोजितच असते. अन् ती पार पाडावी महाराजांनीच! अन् म्हणून त्यांना संपूर्ण यश मिळाले. अन् ह्या योजनाबद्ध काम करण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैन्यभरतीची तत्कालीन इस्लामी पद्धत संपूर्णपणे बदलून टाकली. मोगल व अन्य इस्लामी सत्ता सैन्यभरतीची जबाबदारी वतनदार, जहागीरदार, इनामदार व सरदारांवर सोपवीत. हे लोक प्रसंगी जो सापडेल त्याला वेठीला धरून सैन्यात दाखल करीत. या सैनिकांचा पगार वतनदार मंडळीच देत असत. त्या मोबदल्यात त्यांना सरकारकडून जमिनी, गावाचा वसूल तोडून दिला जाई. स्वाभाविकच गरीब सैनिक या मंडळीच्या टाचांखाली चिरडले जात असत. त्यांचा पगार ह्या लोकांच्या लहरीवर अवलंबून राही. त्यामुळे त्यांच्या जीवनात स्थैर्य नसे. शिवाजी महाराजांनी सरळ सरळ वतनदारांमार्फत सैन्यभरतीचे काम बंदच करून टाकले. अन् ते स्वतःच सुरू केले. त्यामुळे सैनिकांना खजिन्यातून दर महिन्याच्या प्रतिपदेला रोख पगार मिळत गेला. पराक्रम गाजविणाऱ्या सैनिकांचा विशेष गौरव, बक्षीस, कर्तृत्वानुसार बढती व स्थैर्य हे महाराजांच्या लष्करी योजनेतील विशेष होते. त्यात महत्त्वाचे म्हणजे आपली माणसे कमी मारली जातील असेच युद्धतंत्र महाराज नेहमी हाताळत असत. स्वाभाविकच त्यांच्या सैन्यात भरती होणे सैनिकांना आवडे. अन् ह्या योजनेचा विशेष म्हणजे काही मुस्लिमही हिंदवी स्वराज्याच्या लष्करात भरती होत. मात्र सैन्य भरती करताना महाराज अतिशय काळजी घेत असत. मोहिमेवर असताना गडा-कोटावर किंवा एखाद्या प्रदेशात तळ दिला असताना महाराज उत्तम सैनिकांच्या शोधात असत. शत्रूकडील उत्तम सैनिकांवरही त्यांची नजर असे. अशी माणसे नेमकी टिपून त्यांना माया लावून, कधी शत्रूशी झालेल्या तहात ती माणसे आपणांकडे देण्याचे कलम टाकून आपल्याकडे मागून घेत. मुरारबाजी देशपांडे, बाजी प्रभू देशपांडे हे शूर सरदार महाराजांकडे याच पद्धतीने आले. अशा शूर, कर्तबगार, पारख करून कसोटीला उतरलेल्या माणसांना सुद्धा सैन्य भरती होण्यापूर्वी जामीन द्यावा लागत असे. महाराज सैनिकांवर विलक्षण प्रेम करीत. अधिकाऱ्यांना भावंडाप्रमाणे वागवीत, सैनिकांच्या कुटुंबाचीही ते काळजी घेत. लढाईत कुणी जखमी झाला तर त्याच्या जखमेचे स्वरूप पाहून शंभर दोनशे होन बक्षीस दिले जाई. लढाईवर कुणी मृत पावला तर त्याच्या विधवा पत्नीस पगाराच्या निम्मा पगार तैनात केला जाई. महाराज अशा घरी जाऊन सांत्वन करीत. मृत सैनिकाच्या मुलाला नोकरीत घेतले जाई. महाराज लष्करावर जेवढे प्रेम करीत तेवढीच त्यांची शिस्तही कडक होती. मोहिमेवर निघालेले लष्कर पहिल्या मुक्कामावर पोहोचले की अधिकारी सर्व सैनिकांची कसून तपासणी करीत. त्यांच्या जवळील वस्तूंची नोंद केली जाई. मोहिमेवरून लष्कर परतले की स्वराज्याच्या हद्दीवर पुन्हा सर्व लष्कराचा झाडा घेतला जाई. कुणी लुटीचा माल चोरून ठेवलेला आढळला तर त्याला कडक शिक्षा होई. लष्करात बायको, बटकी, कलावंतीण मुळीही असता कामा नये, असा दंडक होता. असा कुणी बाळगणारा आढळला तर त्याची चक्क गर्दनच मारली जाई. मिळालेली लूट ताबडतोब सरकारी खजिन्यात जमा करावी यावर महाराजांचा विलक्षण कटाक्ष होता. परमुलुखात स्त्री, गाय, ब्राह्मण कैदी करून आणू नयेत. सामान्य जनता, गोरगरीब, लहान मुले, लहान दुकानदार यांना कुठलाही उपसर्ग पोहोचू नये असा महाराजांचा दंडक होता. त्यामुळे स्वराज्यातील सामान्य जनता शिवाजी राजांच्या शिलेदारांकडे, सैनिकांकडे फार मोठ्या आदराने पाहत असे. (“स्वराज्याच्या शिवालयासमोर अनेक वीरांनी आपल्या देहाच्या दीपमाळा तेवत ठेवल्या. शिवाजी महाराजांना महादेव मानून आपल्या प्राणांची बिल्वदळे महाराजांच्या ओंजळीत टाकली. स्वराज्याचा इतिहास अशा पुरुषोत्तमांनी घडविला”)


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)