Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार कान्होजी जेधे


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार कान्होजी जेधे - प्रभाकर भावे

Description:

कान्होजी जेधे यांचे चरित्र.रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उष:काल! “नंदनवनाचे रणांगण बनले होते. संसारातील पाखरे होरपळून मरू लागली. आकांत उडाला. आर्त किंकाळ्यांनी दिशा कोंडल्या. माणसांचा खाटीकखाना सुरू झाला. नद्यांची उदके रक्ताळली तारुण्य आणि सौंदर्य हे मराठ्यांच्या लेकी-सुनांचे अपराध ठरले! कुण्याही हैवानानं कुण्या मराठ्याच्या घरात अन् हाती लागेल ती कळी फरफटत, ओढत कुस्करावी अन् तिचे कलेवर नदीत नाहीतर डोहात फेकून द्यावे. तिचा हंबरडा ऐकायलाही कुणी वाली उरला नव्हता. हाल, दुःख, बेअब्रू! माणुसकीच जिथे संपली!! तरुणींच्या, म्हाताऱ्यांच्या अन् अर्भकांच्या किंकाळ्यांनी प्रत्यक्ष काळोखही गुदमरला, पण! वतनाचे राजकारण संपले नाही? अन् कधीतरी हे संपेल असे त्या वेळी कुणाला वाटले नाही अन् ते संपवावे असा विचार कधी कुणाच्या मनाला शिवला नाही! अन् हेही दिवस बदलले. शिवशाहीचा उदय झाला! कान्होजी जेधे- अगदी योग्य वक्ताला शहाजी राजांनी महाराजांकडे पाठवले. अफझलखान भेटीप्रसंगी कान्होजी जेध्यांनी कर्तृत्व पणाला लावून महाराजांना जी संगत सोबत दिली, त्याला तोड नाही. अन् एवढे करून देखील कुठल्याही मानापानाला ते हपापले नाहीत. त्यांचं मन फार मोठं होतं! मोठं होतं! मोठं होतं!!!”


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)