Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार नेताजी पालकर


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार नेताजी पालकर - प्रभाकर भावे

Description:

सरनौबत नेताजी पालकर यांना ‘प्रतिशिवाजी’, ‘महाराजांचा उजवा हात’ असे संबोधत असत.पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा! सरनौबत नेताजी पालकर यांना ‘प्रतिशिवाजी’, ‘महाराजांचा उजवा हात’ असे संबोधत असत. अन् दुर्दैवाच्या फेऱ्यामुळे त्यांच्या आयुष्यात काही अकल्पित अशा घटना घडल्या. नशीब फिरले. दैवाचा फासा उलटा पडला. ते निर्दोष असूनदेखील त्यांना शारीरिक व मानसिक यमयातना भोगाव्या लागल्या. अन् त्यातून निसटण्याची योग्य संधी ते दिलेरखानाबरोबर हिंदवी स्वराज्यातच चालून येत असताना मिळाली अन् ते सटकले ते रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांपुढे येऊन उभे राहिले. तब्बल नऊ वर्षे मुसलमान म्हणून ऐन काबूल-कंदहारच्या मुसलमानी प्रदेशात व मुघल छावणीत राहिलेला नेताजी पालकर आज अचानक पुन्हा रायगडावर दाखल झाला होता. महाराजांनी ममतेने त्याला आपलेच म्हटले. अन् महाराजांनी एक विलक्षण क्रांतिकारक पाऊल टाकायचे ठरवले. नेताजीला महाराजांनी पुन्हा हिंदू करून घ्यायचे ठरविले! भवतीचे सारे हिंदू जग कर्मठ होते. परधर्मीयांच्या विटाळाचे पाणीही जिथे निषिद्ध ठरत होते, तेथे नऊ वर्षे बाटलेल्या एका मुसलमानाला पुन्हा शुद्ध करून पंगतीला घ्यायचे? महाकर्मकठीण! अशुद्धांना शुद्ध करून घ्यायचे या गंगायमुनांचे सामर्थ्य लोक विसरूनच गेले. लोक अक्षरश: वेडगळ बनले. अहो! खिचडीच्या एका घासात किंवा पावाच्या एका तुकड्यात जर एखाद्याला बाटविण्याचे बळ असेल तर गंगेच्या एका ओंजळीत, गायत्री मंत्राच्या एका ओळीत अन् तीर्थक्षेत्रातील चिमूटभर धुळीत त्या बाटलेल्याला क्षणात शुद्ध करून घेण्याचे सामर्थ्य नसावे काय? गंगायमुनांपेक्षाही पावाचा तुकडा अन् खिचडीचा घास जास्त प्रबळ काय? पण या गंगेचे माहात्म्य पुन्हा पुन्हा ओरडून सांगणारा भगीरथ, गायत्री मंत्राचे माहात्म्य पुन्हा पुन्हा समंत्र पटविणारा विश्वामित्र आणि तीर्थक्षेत्रातील धूळीकणांचे माहात्म्य सांगणारा एखादा आद्य शंकराचार्य या भूमीत पुन्हा झालाच नाही! छत्रपती शिवाजीराजे ती महती आपल्या कृतीने जगाला दाखविणार होते. म्हणूनच हा प्रयोग क्रांतिकारक होता. अन् संस्कारपूर्वक महाराजांनी नेताजीला शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. १९ जून १६७६. महंमद कुलीखान पुन्हा पूर्ववत नेताजी पालकर झाला. नेताजी जातगंगेत आला!


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)