Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार तानाजी मालुसरे


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार तानाजी मालुसरे - प्रभाकर भावे

Description:

सुभेदार तानाजी मालुसरे! हे शब्द ऐकताच प्रत्येक मराठ्याची छाती अभिमानाने रुंदावते, कारण तानाजी मालुसरे! म्हणजे फक्त तानाजी मालुसरेच. दुसऱ्या कुणाची त्याच्या पंक्तीला नाव घेण्याची याद देखील येत नाही!शब्दांच्या पलीकडले! “सुभेदार तानाजी मालुसरे! हे शब्द ऐकताच प्रत्येक मराठ्याची छाती अभिमानाने रुंदावते, कारण तानाजी मालुसरे! म्हणजे फक्त तानाजी मालुसरेच. दुसऱ्या कुणाची त्याच्या पंक्तीला नाव घेण्याची याद देखील येत नाही! महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध उघडउघड युद्ध करण्याचा निश्चय केला. राजधानी किल्ले राजगडासमोर अवघ्या सहा कोसांवर असलेला कोंडाणा ऊर्फ सिंहगड प्रथम काबीज करून या मोहिमेचा शुभारंभ करण्याचा बेत ठरविला. नव्या मोहिमेचा पहिला नारळ सिंहगडाच्या उंबरठ्यावर फुटणार होता. हा अती अती अवघड नारळ तानाजीरावांनी उचलला. तानाजीरावांचा शब्द म्हणजे बेलाचे पान. एकदा त्यांनी उचलले की ते शिवाच्या मस्तकींच पडायचे! कुणीतरी त्यांना एकदा गमतीने विचारले- अहो तुमी इतकी लढाई खेळता, तुम्हाला मरण्याचे भ्या वाटत नाही? तेव्हा ते उद्गारले, ‘‘भवानी मंदिरात स्वातंत्र्याची आन घेतली त्याच वक्ती हे डोस्कं- नारोळ म्हणोन पायावर घातलेलं हाय! अवो असले दहा नारोळ वाहिले गेले तरी चालत्याल- ते एक मस्तक राखण्यासाठी. महाराजांच्या जगन्याच्या म्होरं, महाराजांच्या शब्दाम्होरं, मरणाचं भ्या हाय कुणाला?” ‘‘काय ही माणसं. हिंदवी स्वराज्याचा मांड मांडण्यासाठी जन्माला आली. अहो यांना स्वतःच्या जीवाची पर्वाच कुठे होती. ही माणसे ‘महारांजांपुढे उभे राहून मुजरा करीत त्या वेळी त्यांच्या एका हातात तुळशीपत्र तर दुसऱ्या हातात निखारे असत अन् आपल्या अंतरीच्या मायेच्या बोलांनी महाराजांना विचारत असत की, सरकार, सांगा, सांगा, यातले संसारावर, घरादारावर काय ठेवू? आज्ञा करावी.” “खरोखरच हे जिणं अन् असं मरण उपभोगणं खरं शब्दांच्या पलीकडले आहे!!!”


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)