Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार फिरंगोजी नरसाळा


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार फिरंगोजी नरसाळा - प्रभाकर भावे

Description:

फिरंगोजी नरसाळे यांचे चरित्र.देव देश अन् धर्मासाठी प्राण घेतले हाती! सबंध दिवसभर खिंडारावर लढाई चालू होती. ताज्या दमाचे असे मोंगलांचे हल्ल्यावर हल्ले सारखे होत होते. पण मराठे मात्र तेवढेच अन् तेच होते. ते अविश्रांत लढत होते! अपरंपार शत्रुसागराशी अगस्तीच्या आत्मविश्वासाने लढण्याचे धैर्य त्यांच्यात आले तरी कसे? कोणी शिकवली ही चिकाटी?” हे सर्व त्यांना शिकविले शिवाजी राजाने! परंतु अंतरांत निष्ठा, ईर्षा आणि महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय राज्य अन् विद्या प्राप्त होत नसतात! त्यासाठी अशी निष्ठा, अशी वीरश्री, अशी महत्त्वाकांक्षा, अन् असा ज्वलंत अभिमान असावा लागतो. हेच तर मराठ्यांचे खरे सामर्थ्य होते. ते त्यांनी महाराजांच्या तालमीत कमावले होते.” वाचकहो! फार खेद होत आहे लिहिताना की ‘फिरंगोजी नरसाळे’ यांचे बद्दल त्यांचे गाव, घर, वतनवाडी, कुटुंबकबिला आदीची काहीच माहिती उपलब्ध नाही.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)