Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार मदारी मेहेत्तर


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार मदारी मेहेत्तर - प्रभाकर भावे

Description:

शिवरायांचे शिलेदार मदारी मेहेत्तर यांचे कर्तृत्व या पुस्तकात सांगितले आहे.सदैव सैनिका पुढेच जायचे! मदारी-मेहत्तर हा रजपूत होता. मुसलमानांनी पराजीत रजपूत लोकांना अनंत अत्याचार व अनन्वित छळ करून जबरदस्तीने बाटविले. परंतु त्यात देखील थोडेसे स्वाभिमानी, स्वधर्माभिमानी होते. ते मुसलमान व्हायला तयार झाले नाहीत. तेव्हा अशा लोकांना महाभयंकर शिक्षा तत्कालीन राज्यकर्त्यांनी दिल्या. त्यात जबरदस्तीने संडास साफ करणे, गटारे साफ करणे, मैला डोक्यावरून वाहून नेणे इत्यादी घृणास्पद कामे त्यांचेकडून करून घेतली. अन् त्या लोकांची ‘मेहेत्तर’ जमात तयार झाली. यांच्यात चव्हाण, गुद्विएत, तोमर, सोलंकी वगैरे आडनावे आढळतात. ही रजपुतांची आडनावे आहेत. हे शुद्ध हिंदू रजपूत आहेत. परंतु वर्षानुवर्षांच्या गैरसमजुतीने ‘मदारी मेहेत्तर’ हे मुसलमान समजले जातात. त्यांच्या विवाह पद्धती, पूजा वगैरे शुद्ध हिंदूंच्या पद्धतीप्रमाणेच आहेत. पण याच्या जातकुळाची पंचाईत हवी कशाला? हा मुसलमान की हिंदू ? हा वाद संशोधकांनी करावा. अन् ह्याचे शिवाजी महाराजांवरील निर्व्याज प्रेम, याची सेवाभावी वृत्ती अन् स्वातंत्र्याची पूजा करणारे विशुद्ध मन. या एका अतिसामान्य इसमाने आपली चतुराई मात्र महाराजांच्या सुटकेसाठी पणाला लावून वाचकांच्या हृदयात आदराचे, मानाचे स्थान मिळवले आहे.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)