Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार जीवा महाला


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार जीवा महाला - प्रभाकर भावे

Description:

जीवा महाला यांचे चरित्र.ही तर सुवर्णाची घटका! नुसती त्या प्रसंगाची आठवण झाली, कल्पना केली, तरी देखील अंगावर भीतीने अजूनही शहारे उत्पन्न होतात, मन भेदरते, अन् खरोखरच मनोमनी त्या जीवा महालाचे शतश: आभार मानले जातात. काही पांढरपेशे, ताठ कॉलर करीत चालणारे इतिहासाचे वाचक, अभ्यासक व तथाकथित संशोधक या जिवाचा तो न्हावी म्हणून ‘अनादर’ दाखवतात. परंतु खोल विचार करू जाता असे ध्यानी येते की त्या क्षणी जीवा महाला हा कुणी एक न्हावी नसून तो प्रत्यक्ष देवदूतच या रूपाने महाराजांच्या रक्षणासाठी धावला. “दैवायत्तं कुले जन्म: मदायत्तं तु पौरुषम्” ही उक्ती ही सर्व मंडळी सोईस्करपणे विसरलेली दिसतात. म्हणून काही त्या जीवा महालाचे कर्तृत्व तसूभरदेखील कमी होत नाही! “जन्मा येऊन एखादे तरी पुण्यकर्म असे करावे की वर्षानुवर्ष आपण कीर्तीरूपे सज्जनांच्या हृदयात वास करू शकतो!! अन् ही रामदासांची उक्ती त्या न्हाव्याने- जीवा महालाने स्वकर्तृत्वाने खरी करून दाखविली आहे. उलटपक्षी या घटनेचा, त्याच्या कर्तृत्वाचा आम्हां भारतीयांना अभिमान वाटावा, अशीच ती आहे. या व्यक्तीबद्दल जास्तीत जास्त संशोधन व्हावयास हवे आहे. त्यामुळे त्याच्या चरित्रावर जास्तीत जास्त प्रकाश पडेल.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)