Id SKU Name Cover Mp3
शिवरायांचे शिलेदार मुरारबाजी देशपांडे


30 110
Download Bookhungama App

शिवरायांचे शिलेदार मुरारबाजी देशपांडे - प्रभाकर भावे

Description:

मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील किल्ले पुरदंरची मोहीम हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मुरारबाजींचे कर्तृत्व, श्रेष्ठत्व व असामान्यत्व ध्यानी येईल.उकळता लाव्हाच तू!! किल्ले पुरंदर वेढ्याचे वेळी थोड्याशाच मराठा सैनिकांनी किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली मोगलांशी जी प्रखर झुंज दिली, त्याला इतिहासात तोड नाही! प्रत्येक बुरूज अन् बुरूज माची अन् माची जिंकून घ्यावयास मोगलांना मराठ्यांशी प्रखरपणे लढाई खेळावी लागत होती. कित्येक आठवडे प्रखर लढा देऊन अखेरीस तो बुरूज वा ती माची मोंगलांच्या ताब्यात येत होती. तेव्हा या संपूर्ण लढ्याचे तपशीलवार वर्णन तसेच मराठ्यांनी वेळोवेळी दाखविलेली मर्दुमकी आजही लष्करी तज्ज्ञांनी अभ्यासण्याजोगी आहे. एवढेच नव्हे तर मुरारबाजी देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील किल्ले पुरदंरची मोहीम हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मुरारबाजींचे कर्तृत्व, श्रेष्ठच व असामान्यत्व ध्यानी येईल. वाचक हो! एकदा तरी किल्ले पुरंदरवर जावे. पुण्यावरून सासवड येथे जावे. तेथून अगदी चार मैलांवर हा किल्ला आहे. पायथ्यापर्यंत एस.टी.ची बस जाते. किल्ले पुरंदर व वज्रगड ऊर्फ रुद्रमाळ हे दोन्ही भाग फिरून डोळेभरी पहावे. तेथील पडझडीत दडलेल्या इतिहासाच्या खाणाखुणा चाचपडत त्याचा मागोवा घ्यावा. उंच केदारेश्वराच्या मंदिरात जावे? तेथून चारी बाजूला आपली भिरभिरती नजर घुमवावी. केदारेश्वराचे दर्शन घ्यावे! गडावरले भन्नाट वारे अंगावर झेलत झेलत हळूहळू गड उतरावा! अन् घरी आल्यावर पुन्हा ही मुरारबाजी देशपांड्यांच्या धारातीर्थी पतनाची हकीकत वाचावी...! खरोखरच आनंदाच्या स्पंदनाच्या मोठ्या ऊर्मी आपल्या अंतःकरणात उसळतील...! तो आनंद शब्दांनी सांगणे नलगे.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)