Id SKU Name Cover Mp3
शाब्बास शरलॉक होम्स! भाग - ५


60 118
Download Bookhungama App

शाब्बास शरलॉक होम्स! भाग - ५ - भा.रा.भागवत

Description:

भा. रा. भागवत यांच्या खास लेखनशैलीत.रांगणाऱ्या माणसाचे रहस्य... शरलॉक होम्सकडून संध्याकाळी तातडीचं निमंत्रण आल्यामुळे मी त्या दिवशी बेकर स्ट्रीटवर गेलो, तेव्हा स्वारी आपल्या आरामखुर्चीत पाय दुमडून बसली होती. पाइपमधून धुराचे भपकारे निघत होते. मी खोलीत शिरलो तेव्हा त्याने त्याच्या नेहमीच्या खुर्चीकडे हात केला. पण मग अर्धा तास माझी दखल घेतली नाही. नंतर एकदम आपल्या विचारांतून तो ताडकन् जागा झाला अन् माझ्याकडे पाहून त्याने स्मित केले. ‘माफ कर, वॉटसन–’ तो म्हणाला. ‘गेल्या चोवीस तासांत मला एकामागून एक काही गोष्टी कळल्या. त्यातून विचारांना आणखी काही फाटे फुटले. त्यात मी इतका गुंतलो होतो की मला भानच राहिलं नाही. - वॉटसन. माझ्या मनात एक प्रबंध लिहायचा आहे. विषय ‘गुप्त पोलिसाच्या कामात कुत्र्याची भूमिका’. ‘कुत्रा हा कौटुंबिक जीवनाचा आरसा आहे. एखाद्या उदासवाण्या घरातला कुत्रा कधी मजेने उड्या मारताना दिसलाय का? नाही. किंवा एखाद्या सुखी कुटुंबात कधी रडतोंड्या कुत्रा असतो का? नाही. भांडखोर घरातला कुत्रा चवताळून भुंकतो आणि धोकेबाज माणसांचा कुत्रा त्यांच्याच सारखा धोकेबाज असतो.’ मी मान हलवली. ‘हे जरा जास्त होतंय, होम्स’ त्याने पुन्हा पाइपमध्ये ताजी तंबाखू भरली, आणि पुढे तो म्हणाला, ‘मी जे आता बोललो ते माझ्या हातातल्या सध्याच्या केसला सहीसही लागू पडतं. ही केस म्हणजे एक गुंतावळा आहे. त्यात एखादा तरी सुटा धागा सापडतो का म्हणून मी बघतो आहे. आणि तसा धागा मला वाटतं एका प्रश्नात आहे. प्रश्न हा : प्रो. प्रेसबरींचा कुत्रा त्यांना का चावतो?’ मी खुर्चीला पाठ टेकली. हात्तिच्या! एवढ्याचसाठी का गृहस्थाने मला मुद्दाम बोलवून घेतलं?


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि