Id SKU Name Cover Mp3
Share Marketchi Sutre


60.00 116.00
Download Bookhungama App

शेअर मार्केटची सूत्रे - अरुण वामन पितळे

Description:

सर्वसामान्य माणसाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी वाटते. अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे ठाकतात अन् काही वेळा तर तो पुरता गोंधळून जातो. अशा गुंतवणुकादारांसाठी आणि जे नियमितपणे शेअर मार्केटमध्ये उलाढाली करत आहेत अशांसाठीहीशेअर मार्केटची सूत्रेहे पुस्तक  मनोगत

सर्वसामान्य माणसाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना काळजी वाटते. अनेक प्रश्न त्याच्यासमोर उभे ठाकतात अन् काही वेळा तर तो पुरता गोंधळून जातो. अशा गुंतवणुकादारांसाठी आणि जे नियमितपणे शेअर मार्केटमध्ये उलाढाली करत आहेत अशांसाठीहीशेअर मार्केटची सूत्रेहे पुस्तक सादर करताना मला आनंद होत आहे.

या पुस्तक निर्मितीसाठी काही वर्षांचा काळ लागला आहे. मराठीमध्ये अशा प्रकारचे संशोधनात्मक पुस्तक अभावानेच आढळेल.

या पुस्तकात अगदी साधी अशी शेअर मार्केटमधील शेअर्सची सूत्रे किंवा फॉर्म्युले किंवा ठोकताळे दिले आहेत. ते कसे बनवावयाचे याचे सांगोपांग विवेचनही दिले आहे. तसेच त्या सूत्रांचे दीड तपाचे नमुने दिलेले आहेत. त्यामुळे आपला त्या सुत्रांवर विश्वास बसेल.

ही सूत्रे म्हणजे जणूकाही शेअर्सचा साचाच आहे. या साचेबंद सुत्रांमुळे शेअर्सचा छोटा गट तयार होतो. हे साचे लक्ष्मीचे साचे आहेत, असे समजण्यास काहीच हरकत नाही.

हे पुस्तक वस्तुनिष्ठ (प्रॅक्टिकल) असल्यामुळे, त्यामधील सूत्रांचा प्रयोग करताना ते वारंवार संदर्भासाठी पाहाणे आवश्यक असते. एकापेक्षा अधिक सूत्रांचा वापर करतेवेळी, करताना आज ना उद्या पुस्तक हाताशी असणे आवश्यक आहे.

एखाद्या सुत्रात गुंतवणुकीची रक्कम एकदाच भरावयाची असते आणि वाढलेल्या रकमेमध्ये वार्षिक सुधारणा करीत जायचे असते, अशी या सुत्रांची कार्यपद्धत दिलेली आहे.

ही सूत्रे बनविताना पुनरावृत्ती जाणवते. पण जेव्हा सर्वसामान्य गुंतवणूकदार आपले घामाचे पैसे गुंतवतो, तेव्हा या प्राथमिक सूत्रांची घडण करताना दोन ठिकाणी पाहून खात्री केल्यावर त्याचा विश्वास दृढ होतो.

सुत्रांसाठी २६ वर्षापासूनचे सिद्ध झालेले नमुने दिलेले आहेत, अर्थात त्याचे परिणाम, फायदे किंवा त्याच्या कृतियोजना आजसुद्धा लागू पडत आहेत. ‘डाऊचे संस्थापक चार्लस डाऊ यांनी शेअरबाजार मधील ३ गतींचे १०० वर्षांपूर्वी जे संशोधन केले आहे, ते आजसुद्धा जगभरातील स्टॉक एक्सचेंजमधील गुंतवणूकदार उपयोगात आणत आहेत, कारण त्याला पर्याय नाही.

या पुस्तकात बरीच आकडेवारी आहे. एक आकडा ५० शब्दांच्या तोडीचा असतो. तसेच यामध्ये दाखविलेले आलेख १०० आकड्यांच्या तोडीचे आहेत. आलेख म्हणजे शेअर मार्केटचा मार्गदर्शक नकाशाच होय.

या पुस्तकात कंपन्यांच्या व्यवसायाची प्राथमिक तत्त्वे सविस्तरपणे दिलेली आहेत. त्या तत्त्वांचा उपयोग कंपनीच्या व्यवसायात कसा करण्यात आला, याची कल्पना काही कंपन्यांच्या उदाहरणासह दिलेली आहे.

अशा प्रकारच्या आर्थिक विषयाच्या पुस्तकात वाचकांच्या मनात अनेक प्रश्न (FAQ) उद्भवत असतात. ही बाब लक्षात घेऊन या पुस्तकात आपल्या मनातील प्रत्येक प्रश्नांचे उत्तर विषयाप्रमाणे विवेचनात दिलेले दिसून येईल. त्याकरिता प्रत्येक वाचकाने पुस्तकाचे पहिले वाचन बारकाईने करणे आवश्यक आहे.

हे पुस्तक सर्वसाधारण गुंतवणूकदारांना, तसेच मोठ्या उलाढाली करणाऱ्या गुंतवणूकदारानाही खचितच उपयोगी पडेल, तरीही पुस्तकाची उपयुक्तता वाढवण्याच्या दृष्टीने पत्ररूपाने येणाऱ्या सूचना स्वागतार्ह आहेत.

हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी उत्कर्ष प्रकाशनचे श्री. सु. वा. जोशी यांनी स्वीकारले आणि पुस्तकरूपाने वाचकांपुढे सादर केले. त्यांचा मी अत्यंत आभारी आहे.

या पुस्तक निर्मितीमध्ये श्री. अनिरुद्ध पागे यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले आहे. त्यांनी बहुमोल सूचना केल्या हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करू इच्छितो. या सर्व वाटचालीत माझी पत्नी सौ. निर्मलाने दिलेला वेळ आणि केलेली मदत ही शब्दांत व्यक्त करण्यापलीकडली आहे.

- अरुण वामन पितळे


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि