60.00 116.00
Download Bookhungama App

संस्कार - यू. आर. अनंतमूर्ती

Description:

'संस्कार' ही 'ज्ञानपीठ' मानकरी, ख्यातनाम कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी. या कादंबरीत ब्राह्मण्य, परंपरा, हिंदू धार्मिक ग्रंथ यांवर कठोर टीका असल्याने या कादंबरीची गणना विद्रोही साहित्यात होते.'संस्कार' ही 'ज्ञानपीठ' मानकरी, ख्यातनाम कन्नड लेखक यू. आर. अनंतमूर्ती यांची कादंबरी.

या कादंबरीत ब्राह्मण्य, परंपरा, हिंदू धार्मिक ग्रंथ यांवर कठोर टीका असल्याने या कादंबरीची गणना विद्रोही साहित्यात होते.

कादंबरीत सुरुवातीलाच, जन्माने ब्राह्मण, परंतु रूढार्थाने पापमय जीवन जगलेला नारायण याचा मृत्यू घडतो. लग्नाच्या बायकोला सोडून चंद्री या वेश्येशी संसार करणाऱ्या, मांसाहार व दारू यांच्या आहारी गेलेल्या या माणसाचा अंत्यसंस्कार करावा, की करू नये, या वादंगावर कादंबरी सुरु होते.

प्रेत तसेच पडलेले आहे; आणि पवित्र आयुष्य आणि धर्मनिंदक जीवन, भौतिक सुख आणि अध्यात्मिक सुख यांतील संघर्ष सनातन्यांपुढे येत राहतात. याच वेळी खळबळजनक घटनाही घडत राहतात.

श्री. अनंतमूर्ती यांची ओघवती शैली, शब्दप्रभुत्व, पात्रांचे प्रभावी स्वभावरेखाटन व कादंबरीची अस्सल भारतीय पार्श्वभूमी यांमुळे कन्नड साहित्यातच केवळ नव्हे, तर समग्र वाड्म़यविश्वात ही कादंबरी लक्षणीय ठरली आहे.

कन्नड कादंबरीकार व कथाकार रं. शा. लोकापूर व मराठीतील कादंबरीकार व कथालेखक वि. ग. कानिटकर यांनी संयुक्तपणे केलेला हा मूळ कन्नड कादंबरीचा सरस मराठी अनुवाद.


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि