60 116
Download Bookhungama App

संगीत संशय – कल्लोळ - कै. गोविंद बल्लाळ देवल

Description:

Musical Dramaप्रवेश १ला नांदी (आलनबी) सौख्यसुधा वितरो।।सदा नव।। तुम्हां सदाशिव।। हिमगिरिजाधव साधुजनांचा ताप परिहरो।।धृ.।। स्वकरें निज शिरिं गंगा बसवी।।मत्सरभावें सतीस रुसवी।। शशि लक्षिसी तूं अशिवे केषीं।। पुसे रुसे तो भविं तारो।।१।। साकी बलवत्पदनत गोविंदाने संगीती नटविले।। संशय-कल्लोलाख्य सुनाटक हास्यरसें आश्रयिलें।। प्रयोगरुपें तें।। श्रवणेक्षणिं च्या स्थिरचित्तें।।१।। पद [नांदीनंतर साधु प्रवेश करुन] हृदयी धरा हा बोध खरा।। संसारी शांतिचा झरा।।धृ.।। संशय खट झोटिंग महा।। देऊं नका त्या ठाव जरा।।१।। निशाचरी कल्पना खुळी।। कवटाळिल ही भीति धरा।।२।। बहुरुपा ती जनवाणी।। खरी मानितां घात पुरा।।३।। आमच्या कार्तिकनाथाच्या दीपोत्सवाकरितां बाईसाहेबांनी एक मण तेल देण्याचें कबूल केल – फाल्गुन– [पडद्यात] जा येथून, तुला कांही मिळणार नाही. साधु– अहो, असे उगीच अंगावर कां येतां? बाईसाहेबांनी कबूल केलं, म्हणून मी मागायला आलों. फाल्गुन– [पडद्यांत] नुसते ढोंगी— साधु– तुम्हांला धर्मादाय करायचा नसेल तर करु नका. उगीच संशय कां घेतां? ही संशयाची वृत्ती दानधर्माच्या आड येऊन पुण्यक्षय करते, इतकंच नव्हे तर संसारातील रोजच्या कृत्यांतही हें संशयाचं पिशाश्च सुखांत माती कालवतं. नका करूं दानधर्म, मी जातो, पण तुमचेही स्वतःचे कल्याणासाठी माझा बोध ध्यानांत ठेवा. हृदयी धरा हा बोध खरा।।— (जातो) फाल्गुन– [बाहेर येऊन] अरे ढोंग्या— पद शिणवुं नको कंठ असा।। तृषित न मी बोधरसा।। ढोंग्या राही, उभाही, जरासा।।धृ.।। साधु न तुम्ही, भोंदु चोर।। धूर्त कपटी शठ कठोर।। पाडितसां व्यसनिं थोर।। देवखुळ्या स्त्रीपुरुषां।।१।। चल निघ. समजलो. माझ्या बायकोला कोणाचा तरी निरोप पोंचवायला, नाही तर चिठ्ठीचपाटी द्यायला, कुणी तरी आला असेल झालं. ती तरी कसली हिकमती! आज म्हणे मावशीला भेटायला जातें, आज बहिणीचा निरोप आला होता, आज काय आत्याबाईनं बोलावण पाठवलनं, दररोज नवी युक्ति काढीत होती; पण आतां त्यातली एक देखील युक्ती चालूं द्यायचा नाही म्हणावं आणि एवढ्यासाठी तर या विशाखपुराबाहेरच्या स्वतःच्या बंगल्यात येऊन राहिलों. हो, अशा बायकोला शहरांत राहून जपणार किती? त्यांतून चंगी भंगी छत्तिसरंगी अशा लोकांचा सुळसुळाट अलीकडे तर अगदी अनावर झाला आहे. रामदास, हरदास, पुराणिक, वेदांती, ब्रह्मचारी, एकापेक्षा एक बिलंदर! तें कांही नव्हे. मी केलं हेंच फार उत्तम! तिला बाहेर जायला नको आणि तिच्याशी कुणी बोलायला नको. यांत मला मात्र पहारा करावा लागतो, पण तो पुरवला. आतां एकट जे बसायचं ते तिला हांक मारुन दमयंतीचं चरित्र वाचायला सांगावं, अग ए, त्या आंतल्या चंदनी पेटींत वरतीच एक पुस्तक आहे, तें घेऊन ये पाहूं. ऐकलस का ग? अरे! ओ देत नाही.(दाराकडे जात) कां, आतां मौनव्रत धरणार वाटतं? अं, इथेही दिसत नाही! अग, ए, कुठें आहेस ग? (इकडे तिकडे पाहून) गेली वाटतं! दिल्यान् तुरी हातावर! भादव्या, अरे ए भादव्या, भादव्या, चल लवकर, फाल्गुनराव, बसा आतां हांका मारीत! ए भादव्या, आलास की नाहींस रे? हा सुद्धां चोर तिलाच सामील झाला वाटतं! (भादव्या येतो त्यास) कायरे? कुठें आहे ती? भादव्या– मागल्या दारनं कार्तिकनाथाच्या देवळाकडे गेल्या धनीसाहेब. फाल्गुन– मागल्या दारानं! भादव्या जा आधीं, आतांच्या आत्तां गंवड्याला बोलावून घेऊन ये, आणि तो दरवाजा आधीं बंद करुन टाक. आजपासून नियम; दोन दरवाज्यांच्या घरांत रहावयाचं नाही. या दरवाजावर बसलों तर त्या दरवाजानं गेली! अशा सतरा दारं आणि तेहतीस खिडक्यांच्या घरांत नवऱ्याला शंभर डोळे असले तरी कसे पुरणार? तू काय म्हटलंस? कार्तिकनाथाच्या देवळांत गेली?


Format: Adaptive

Publisher: सृजन ड्रीम्स प्रा. लि