Id SKU Name Cover Mp3
संपूर्ण पंचतंत्र पहिले तंत्र : मित्रभेद


60 116
Download Bookhungama App

संपूर्ण पंचतंत्र पहिले तंत्र : मित्रभेद - श्री. ह. अ. भावे

Description:

संपूर्ण पंचतंत्र’ हे मूळ संस्कृत पंचतंत्राचे शब्दश: भाषांतर आहे व कुठलाही क्रमसुद्धा बदललेला नाही. अशा तऱ्हेचे हे मराठीतील पहिलेच भाषांतर आहे. ‘पंचतंत्र’ म्हणजे’तंत्र’ नामक पाच कथासमूहांचा संग्रह. पंचतंत्रात मित्रभेद, मित्रसंप्राप्ती, काकोलूकीय, लब्धप्रणाश आणि अपरीक्षितकारक अशी पाच तंत्रे आहेत. या कथासमूहांना अथवा भागांना’तंत्र’ अशी संज्ञा वापरली आहे. मनोरंजक आणि ज्ञानवर्धक असा हा नीतिकथांचा संग्रह आहेप्रस्तावना पंचतंत्र हा नीतिकथांचा संग्रह आहे, हे आपण पाहिले आहे. पंचतंत्राच्या प्रारंभीच’कथामुखा’ मध्ये त्याचे रचना प्रयोजन स्पष्ट केलेले आहे अमरशक्ती राजाच्या तीन’शास्त्रविमुख’ आणि’विवेकरहित’ अशा पुत्रांना केवळ सहा महिन्यांच्या काळात’नीतिशास्त्रज्ञ’ बनविण्याचे आव्हान स्वीकारून विष्णुशर्म्याने हा नीतिबोधक कथांचा संग्रह एका सूत्रात गुंफला आहे. म्हणजे पंचतंत्राचे श्रोते आहेत तीन राजकुमार, जे शास्त्रविमुख आणि विवेकरहित आहेत. त्यांना नीतीचे ज्ञान हवे आहे; पण ती नीती आहे ऐहिक जीवनाशी संबद्ध, धर्म, अर्थ आणि काम या त्रिविध पुरुषार्थांशी संबद्ध, मोक्षसाधनेशी त्यांना कर्तव्य नाही. त्याचमुळे मनू आदींनी सांगितलेले धर्मशास्त्र, चाणक्य आदींनी सांगितलेले अर्थशास्त्र आणि वात्स्यायन आदींनी सांगितलेले कामशास्त्र यांचे ज्ञान राजकुमारांना व्हावे, त्यांच्या ठायी बुद्धिप्रकाश फाकावा, अशीं राजाची इच्छा आहे. परंतु जीविताची मर्यादा आणि ज्ञानाची असीमता व अनंतता ध्यानी घेता हे सारे ज्ञान संक्षेपाने, पण नेमकेपणाने प्रात झाले पाहिजे, ते केवळ पुस्तकी न राहता व्यवहाराच्या, नाना जीवनप्रसंगांच्या संदर्भासह प्राप्त झाले पाहिजे, अशी राजाची स्वाभाविक अपेक्षा आहे. विष्णुशर्म्याने जो कथारूपाचा आश्रय केला आहे, तो या जीवनसंदर्भांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण पंचतंत्रातल्या कथासंभारांतून उमलून आलेले नीतिशास्त्र हे तत्त्वजड राहिलेले नाही; केवळ सुभाषितभांडारासारखे बनलेले नाही; तर नाना प्रकारच्या जीवनसंदर्भांत विश्वासू सोबत करणाऱ्या मित्रासारखे’ बनले आहे. पंचतंत्राचे श्रोते हे’नीतिशास्त्रज्ञ’ होण्याची अपेक्षा राखून अध्ययनाला प्रवृत्त झालेले आहेत, हे आपण कथामुखावरून पाहिलेच आहे. पंचतंत्रातील कथांमधून जी नीती परिस्फुटीत होत आहे, ती नीती मोक्षप्रवण धर्माशी संबद्ध नसून इहप्रवण राजनीतीशी आणि व्यवहारचातुर्याशी संबद्ध आहे. हे इहलोकीचे जीवन वैयक्तिक आणि सामूहिक संदर्भात यशस्वी कसे करावे, त्यात अवधान कसे सांभाळावे, वंचना कशी टाळावी, विपरीत प्रसंगांवर मात कशी करावी आणि’शठं प्रति शाठ्यम्’ या तत्त्वाचा अवलंब करून जीवन संघर्षात टिकाव कसा धरावा, याचाच बोध पंचतंत्रातल्या कथांतून उमलून येतो. म्हणजे पंचतंत्रातल्या नीतिकथा या चातुर्यकथा आहेत; व्यवहार नीतिकथा आहेत. या कथा वाचताना’येथ चातुर्य शहाणे झाले !’ अशी जाणीव वाचकांच्या मनात जागल्यावाचून राहत नाही.


Format: Adaptive

Publisher: वरदा (इ-बुक - सृजन ड्रीम्स प्रा. लि.)